Wednesday, 4 July 2018

वंदे मातरमने विधान सभेच्या कामकाजाची सुरुवात

नागपूरदि. 4 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात आज नागपूर येथे झाली. विधान सभेच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरमने करण्यात आली. 
            यावेळी विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
000

विधान सभेत मुख्यमंत्र्यांकडून नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय
            विधान सभा सभागृह नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्य डेसमंड नॉर्मल एटस (राज्यपाल नियुक्त) व विश्वजित पतंगराव कदम यांचा परिचय विधान सभेत करून दिला. 
0000

विधान सभा तालिका अध्यक्ष नियुक्त
            पावसाळी अधिवेशनासाठी विधान सभा तालिका अध्यक्षपदी  सदस्य सर्वश्री सुधाकर देशमुखराजेंद्र पाटणीसंजय रायमूलकरराहुल बोन्द्रेनरहरी झिरवाळ यांची नियुक्ती विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
000

No comments:

Post a Comment