Wednesday, 1 August 2018

कापूस पिकावरील किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी तज्ञ्ज्ञांचा सल्ला घ्या

    नागपूर 1 :   राज्यात कृषी विभागामार्फत  कापूस पिकावरील कीड व रोग सर्वेक्षणासाठी कॉपसॅप’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कापूस उत्पादक गावांचे प्लॉट तयार करुन त्यांचे दर आठवडयात सर्वेक्षण करण्यात येत आहे . या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने कीड व रोग नियंत्रित करण्यासाठी  कृषी सल्ला शेतकऱ्यांनी घ्यावाअसे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.   
            कॉपसॅपच्या अहवालानुसार राज्यातील 925 गावांमध्ये मावातुडतुडेफुलकिडे  यासारख्या रस शोषण किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे निर्देशनास आले. कापूस पिकावर वाढ संजिवकेहार्मोन्स टॉनिक यासारख्या केवळ कायिक वाढीस मदत करमुळे मावातुडतुडेफुलकिडे यासारख्या रस शोषण किंडीना पोषक ठरते व रसशोषण किडीचा प्रादुर्भाव वाढतो.  यामुळे शेतकऱ्यांना किडीच्या नियंत्रणासाठी फवारणीचा खर्च वाढतो.
संपूर्ण राज्यात कापूस पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच कपासीची 38.75 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली असून  पिके वाढीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे पिकावर  मावातुडतुडेफुलकिडे यासारख्या रस शोषण किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
             वाढ संप्रेरक प्रत्यक्ष पीक उत्पादन वाढी बाबत ठोस निष्कर्ष नाहीत अथवा अशा प्रकारच्या शिफारशी अद्यापही कृषी विभागाकडे व संशोधन केंद्रांनी केलेली नाही. तसेच या औषधी व रसायनांना केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही कायद्यामध्ये मान्यता देण्यात आली नाही. केवळ आकर्षक जाहिराती सुबक पॅकिंग तसेच कोणत्याही अपप्रचाराला शेतकऱ्‍यांनी बळी पडू नये. तसेच अधिक महितीसाठी जवळच्या कृषी सहाय्यककृषी अधिकारी तसेच नजीकच्या तालुका कृषी अधिकारऱ्यांशी संपर्क साधावाअसे आवाहन  कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.    
*****  

No comments:

Post a Comment