Wednesday, 1 August 2018

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथिनिमित्त विधानभवनात अभिवादन



            मुंबई, दि. 1 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथिनिमित्त आज विधानभवन येथील  त्यांच्या पुतळ्यास आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा व माजी विधानसभा सदस्य मधू चव्हाण यांनी  पुष्पहार व पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
          यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे,  विधानपरिषद सभापती यांचे  सचिव म.मु. काज,  विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे  अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह विधानभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
०००

No comments:

Post a Comment