Wednesday, 1 August 2018

ग्रामपातळीवर प्रशासनाचा चेहरा म्हणून काम करा - अनूप कुमार




महसूल दिनी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार
राजशिष्टाचार विभागातील विजय घरडे यांना निरोप
नागपूर, दि. 01 गाव पातळीपासून ते जिल्ह्यापर्यंत प्रशासनाचा चेहरा म्हणून काम करण्याची जबाबदारी ही महसूल विभागाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच जनतेच्या विकासासाठी समरस होऊन काम करून महसूल विभागाचा लौकीक वाढवावाअशी अपेक्षा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी व्यक्त केली. महसूल दिनानिमित्त उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आज महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगलअपर आयुक्त रविंद्र ठाकरेअपर जिल्हाधिकारी प्रकाश पाटीलमहसूल उपायुक्त सुधाकर तेलंगतसेच उपायुक्त के. एन.के.रावश्रीकांत फडकेप्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी शैलेश मेश्रामनिवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजीमहानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र कुंभारे आदी उपस्थित होते.
महसूल प्रशासनाला शासनाचा कणा म्हणून ओळखल्या जातो. नैसर्गिक आपत्तीपासून तर शेतीच्या व्यवस्थापर्यंतची संपूर्ण जबाबदारी महसूल विभागाची असल्यामुळे जनतेचा विश्वास संपादन करून काम करण्याची आवश्यकता व्यक्त करतांना अनूप कुमार म्हणाले कीमहसूल कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवला तर यश संपादन करता येते. विभागात कार्यरत प्रत्येक व्यक्ती हा शासनासाठी महत्वाचा आहे. त्यामुळेच गाव पातळीवरील तलाठीकोतवाल ही पदे आज देखील कायम आहे आणि शेवटच्या घटकांपर्यत शासन यंत्रणा पोहोचविण्याचा दुवा बनला असल्याचे सांगितले.
कालानुरुप महसूल विभागात मनुष्यबळाच्या उपलब्धतेसोबतच संगणकीकरणाला महत्व दिल्यामुळे प्रशासनामध्ये अमुलाग्र बदल होत आहे. नागपूर विभागाच्या कार्याचा आढावा घेतांना अनूप कुमार म्हणाले कीनागपूर हा विभाग विकासासोबतच विविध उद्दीष्टपूर्तीचे यापूर्वी अत्यंत कमी असल्यामुळे दूर्लक्ष होत होते. परंतु आज विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीमध्ये हा विभाग राज्यात अग्रक्रमावर आहे. यामुळेच जनतेला शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ मिळत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी काम करतांना संपूर्ण क्षमता वापरुन काम करण्याची वृत्ती बाळगल्यास शेतकरी व जनतेला चांगले प्रशासन देणे शक्य आहे आणि जनतेची सुद्धा महसूल प्रशासनाकडून हीच अपेक्षा असल्याचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी यावेळी सांगितले.
विजय घरडे यांचा विशेष गौरव
राजशिष्टाचार विभागात 1986 पासून विजय घरडे यांनी केलेल्या कार्यामुळेच संपूर्ण राज्यात नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. आपल्या कार्यक्षमतेने आणि सकारात्मकतेने एखादा कर्मचारी मुख्यमंत्री ते मुख्य सचिवांपर्यत राजशिष्टाचारासंदर्भात थेट नावाने ओळखल्या जातो. ही अभिमानाची बाब असून विजय घरडे यांनी केलेली सेवा महसूल प्रशासनासाठी गौरवपूर्ण बाब असल्याचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी श्री घरडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करतांना विशेष उल्लेख केला.
विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक अतिमहत्वाच्या व्यक्ती तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळांच्या व्यवस्थेसंदर्भात राजशिष्टाचार सांभाळण्याचे महत्वपूर्ण काम विजय घरडे यांनी केले आहे. कुठलेही आवाहन स्विकारुन प्रशासनाची प्रतिमा निर्माण करणाऱ्या विजय घरडे यांच्या कार्यापासून सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी प्रेरणा घ्यावीअसेही विभागीय आयुक्त यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महसूल प्रशासनाच्या सकारात्मक आणि प्रभावी कामामुळे नागपूर शहर व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या जमीनीच्या वर्ग चे वर्ग मध्ये रुपांतरण करण्याच्या निर्णयात संपूर्ण राज्यात उत्कृष्ट कार्य केले आहे. त्याचा लाभ 63 हजार 500 खातेदारांना मिळाला आहे. आकस्मिक संकटाचा सामना करताना विकासाच्या कामातही महसूल विभागाचे उल्लेखनीय योगदान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव
रोजगार हमी योजनेबरोबर उपजिल्हाधिकारी या पदावर कार्य करताना सांभाळतांना उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपजिल्हाधिकारी श्रीमती मनीषा जायभायेतहसिलदार धुमासिंग जाधवजिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीराम कडुनायब तहसीलदार सुनील साळवेअव्वल कारकून श्रीमती रसिका झंझाळमंडळ अधिकारी लोकेश्वर गभणेलिपीक-टंकलेखक एन. आर. शेखतलाठी ए. एस. व्यासशिपाई किशोर गायधनेकोतवाल डेनी चावके यांचा विविध पदावर कार्यरत राहून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. प्रस्तावना अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार श्रीमती स्वप्नाली खाडे यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी मानले.
*****

No comments:

Post a Comment