नागपूर, दि. 01: जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत हरितगृह (शेडनेटगृह) उभारणीकरीता सेवा पुरवठादारांना आमंत्रित करण्यात आले आहे. सेवा पुरवठादारांनी विभागात नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2018-19 अंतर्गत शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांची जिल्हास्तरावर नोंदणी करण्यात येत आहे. ईच्छूक पुरवठादारांनी सदस्य सचिव तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर, नॅशनल काऊन्सिल ऑफ चर्चेज ईन इंडिया समोर, सी. पी. क्लबजवळ, कदीमबाग, सिव्हील लाईन्स, नागपूर440001 या कार्यालयीन पत्यावर संपर्क करण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment