Saturday, 1 September 2018

पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या प्रयत्नामुळे पालघर जिल्ह्यासाठी 262 कोटी रुपये खर्चाच्या 144 पेय जल योजना मंजूर


मुंबई, दि. 1 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केलेल्या सततच्या पाठ पुराव्यामुळे पालघर जिल्ह्यासाठी २६२ कोटी रुपये खर्चाच्या एकूण १४४ ग्रामीण पेयजल योजना मंजूर झाल्या आहेत.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी श्री. सवरा यांना पत्र पाठवून तसे कळवले आहे.सन 2018-19 या वर्षीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील आराखड्यात या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. या योजनांपैकी रु. पाच कोटी पेक्षा जास्त खर्चाच्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तर, पाच कोटी रुपये पेक्षा कमी खर्चाच्या योजना पालघर जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात येणार आहेत.
या मंजुरी बद्दल विष्णू सवरा यांनी समाधान व्यक्त केले असून या योजनामुळे आदिवासी बहुल अशा पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment