मुंबई,
दि.
1 : आपल्या प्रबोधनकारी प्रवचनांतून जागृती निर्माण
करुन समाजाला योग्य मार्गावर चालण्यास प्रवृत्त करणारे क्रांतिकारी राष्ट्रसंत
मुनी तरुण सागरजी महाराज यांच्या निधनामुळे जैन तत्त्वदर्शनाचा आदर्श प्रचारक
हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री
शोकसंदेशात म्हणतात, तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी
सांगितलेल्या आदर्शांनुसार निष्ठेने वाटचाल करीत तरुण सागरजी महाराज यांनी
संसारातील सत्य आणि भ्रामकता आपल्या प्रवचनांतून कठोर शब्दांत मांडल्या. जैन
तत्त्वज्ञानाचा नेमका अर्थ सर्वसामान्यांना समजावून सांगितला. सत्य,
अहिंसा,
संयम,
करुणा
व अपरिग्रह या तत्त्वांचे कट्टर पाठिराखे असलेले तरुण सागरजी महाराज यांचा उपदेश व
कार्य हे फक्त जैन समुदायालाच नव्हे तर संपूर्ण मानव समाजाला प्रेरित करणारे होते.
त्यांचे ‘कडवे प्रवचन’ समाजाला
दीपस्तंभ म्हणून सदैव मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या समाधी निर्वाणामुळे जैन संत
परंपरेतील एका प्रभावी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत.
००००
No comments:
Post a Comment