आरोग्य सेवा आणि
कार्यकारी नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
मुंबई, 7 : शासनाच्या आरोग्य
विभागाने मर्यादित मनुष्यबळाच्या सहाय्याने अनेक नाविन्यपूर्ण आरोग्य कार्यक्रम
राबवून स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस
सारख्या सार्वजनिक आरोग्य समस्या सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.
दूरशिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्यकर्मींना‘ माता आणि बालकांच्या आरोग्य
सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी 'सिंगहेल्थ’ या संस्थेने प्रशिक्षण राबवावे,अशी अपेक्षा आरोग्य
मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र
मुंबई यांनी आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी
व्यक्त केली.
भारत सरकारच्या परिवार कल्याण प्रशिक्षण तथा
अनुसंधान केंद्र मुंबई यांनी दि. 7 आणि 8 सप्टेंबर रोजी 'आरोग्य सेवा आणि कार्यकारी
नेतृत्व'
या
विषयावर राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले
आहे. हे प्रशिक्षण राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र आणि ‘सिंग हेल्थ’ या सिंगापूर येथील
आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
आज आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते दीप
प्रज्वल्लन करुन या प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी केंद्रीय आरोग्य
मंत्रालयातील डॉ. आदेश गडपायले अतिरिक्त आरोग्य महासंचालक (रुग्णालय) श्रीमती
विजया राव,
वरिष्ठ
संचालक सिंगहेल्थ, परिवार कल्याण प्रशिक्षण तथा
अनुसंधान केन्द्राचे संचालक डॉ दीपक राउत, डॉ श्रीनिवास, टाटा ट्रस्टचे
दोराबजी,
आदी
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक डॉ. दिपक राऊत यांनी या
प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्व विषद केले. त्यानी भारतातील सध्याच्या आरोग्यसेवेची
माहिती दिली आणि देशात आरोग्यवर्धक सेवा देणाऱ्या रुग्णालयांची गरज असल्याचे
सांगितले.
श्रीमती विजया राव यांनी सिंगापूरच्या आरोग्य
सेवेची माहिती उपस्थितांना करुन दिली, तसेच राज्यातील आरोग्य कर्मचारी वर्गासाठी प्रशिक्षणात
सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यातील 33 जिल्हा
शल्य चिकित्सक आणि आतिरिक्त शल्य चिकित्सक सहभागी झाले.
००००
No comments:
Post a Comment