नागपूर दि 1 : महानगरपालीकेमार्फत आपले सरकार सेवा केंद्र स्थानाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही लेखी परिक्षा केंद्र वाटप करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही लेखी परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत बचत भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
या परीक्षेला येतांना उमेदवारांनी सोबत मूळ ओळखपत्र जसे आधार कार्ड, मतदान कार्ड, परवाना सोबत आणावे. ओळखपत्राची झेरॉक्स आणू नये. मोबाईल व ब्लू टुथ सारखे इलेक्ट्रानिक उपकरण सेाबत आणू नये. परीक्षेच्या आधी 30 मिनिटे सभागृहात उपस्थित राहावे. उशिरा आल्यास विचार करण्यात येणार नाही. परीक्षेला उमेदवारांनी खरडा व बॉल पेन सोबत आणावा. पात्र उमेदवारांची यादी nagpur.gov.in या वेबसाईटवर लावण्यात येईल. यादी 12 ऑक्टोबर रोजी या साईटवर उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांची मुलाखत दि. 16 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येईल. अधिक माहितीकरिता nagpur.gov.in या वेबसाईटवर भेटद्यावी .
उमेदवारांचे अर्ज क्रमांकनिहाय परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असून परीक्षा 10 ऑक्टोबर 2018 रोजी आहे.
अर्ज क्रं. 1/16/18 ते 131/24/18 पर्यंत 130 उमेदवारांची परीक्षा सकाळी 11.00 वाजता असून हजर होण्याची वेळ सकाळी 10.30 अशी आहे., 132/24/18 ते 258/27/18 पर्यंत 130 उमेदवारांची परीक्षा दुपारी 12.00 वाजता असून हजर होण्याची वेळ सकाळी 11.45 अशी आहे तर 258/27/18अ ते 382/27/18 पर्यंत 124 उमेदवारांची परीक्षा दुपारी 1.00 वाजता आहे. त्यांची हजर होण्याची वेळ दुपारी 12.45 अशी राहील. एकूण 384 उमेदवारांची परीक्षा होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment