Monday, 1 October 2018

अवैध मद्यसाठ्यासह वाहन जप्त

  * राज्य उत्पादन शुल्क्‍ विभागाची कारवाई
* 8 लाख 23 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
नागपूर,दि.1 : सावनेर तालुकाअंतर्गत सावनेर पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध विदेशी मद्याची वाहतुक करणारे वाहन जप्त केले.  या कारवाईमध्ये 8लाख 23 हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
उपायुक्त श्रीमती उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे तसेच उपअधीक्षक मिलींद पटवर्धन यांच्या भरारी पथकाने सावनेर – पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई केली. मिळालेल्या माहिती नुसार महामार्गावर वाहन क्र. एम.एच.34 के-6266 या वाहनाची तपासणी केली असता वाहनात हा मद्यसाठा सापडला. वाहनातून मध्यप्रदेशात निर्मित विविध कंपन्यांच्या अनुक्रमे 96,288 तसेच 192 दारुच्या बाटल्या व  वाहनासह 8 लाख 23 हजार 920 रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला.  याशिवाय चंद्रपूर निवासी सुरज वेंकटी सरदम  (29) इसमास अटक करण्यात आली आहे.
कार्यवाई दरम्यान निरीक्षक ए.ए.शेख, दुय्यम निरीक्षक आर.आर.मोहोड, एस.टी. धिडसे, मुकेश गायधनी, रमेश कांबळे, मिलींद गायकवाड आदींचा समावेश होता.
****

No comments:

Post a Comment