नागपूर, दि. 30 : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. तक्रारकर्त्यांनी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान तक्रार दाखल करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी केले आहे.
लोकशाही दिनात सादर अर्ज स्वत: अर्जदाराने आणावे. अर्ज दोन प्रतीत सादर करावे. तालुकास्तरावरील अर्जावर एक महिन्यात कार्यवाही न झाल्यास त्या संदर्भातील अर्ज जिल्हास्तरीय लोकशाही दिनात स्विकारण्यात येतील. अर्ज करते वेळी अर्जदाराने तालुकास्तरीय टोकन क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. महानगरपालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाशी संबंधीत अर्ज स्विकारले जाणार नाही. अर्जदाराने स्थानिक लोकशाही दिनात संबंधित विभागाची तक्रार सादर करणे अपेक्षित राहील. याशिवाय न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल्स प्रकरणे, न्यायालयीन प्रक्रियेचा अंतर्भाव असलेली प्रकरणे, सेवा, नोकरी व आस्थपनाविषयक प्रकरणे, कार्यालय प्रमुखांनी अंतिम उत्तरे दिलेली प्रकरणे, विहीत नमुन्यात नसणारी व कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment