Friday, 30 November 2018

विधानपरिषद इतर कामकाज : माणगाव येथील चेतक एंटरप्रायजेसच्या प्रकल्पासंदर्भात चौकशी करुन कार्यवाही करणार - प्रवीण पोटे-पाटील

मुंबई, दि. 30 : रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील चेतक एंटरप्रायजेसच्या प्रकल्पासंदर्भात आलेल्या तक्रारीसंबंधी चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करणार असल्याची माहिती पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
            या बाबतची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली होती. त्यावेळी श्री. पोटे-पाटील बोलत होते.
            यावेवळी श्री. पोटे-पाटील म्हणाले, मे. चेतक एंटरप्राईजेस लि. यांच्या सदर प्रकल्पामुळे परिसरातील नागरीकांना धुळीचा व आवाजाचा त्रास होत असल्याबाबतच्या मुख्याधिकारी, माणगांव नगरपंचायत यांच्याकडे प्राप्त तक्रारी त्यांच्याकडून दि. 20.11.2018 रोजीच्या पत्रान्वये उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, महाड, जि. रायगड यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत सदर प्रकल्पास दि. 22.11.2018 रोजी समजपत्र देण्यात येऊन दि. 28.11.2018 रोजी प्रकल्प बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
            या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला होता.
                                                                     000
            

No comments:

Post a Comment