नागपूर, दि. 28 : वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गुरुवार, दिनांक 3 जानेवारी रोजी शिर्डी येथून सायंकाळी 4.45 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व मोटारीने वनामतीकडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वाजता वनामती येथे राखीव. सायंकाळी 5.30 वाजता वनामती येथे महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. रात्री शासकीय विश्रामगृह, नागपूर येथे मुक्काम.
शुक्रवार, दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी 11.00वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, येथे आयोजित युथ एम्पॉवर समिट कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता वरिष्ठ वन अधिकारी कॉन्फरन्सला उपस्थिती. रात्री 9.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश टेकडी गणपती मंदिर विकसित करण्यासंदर्भात बैठकीस उपस्थिती. रात्री शासकीय विश्रामगृह, नागपूर येथे विश्राम.
*****
No comments:
Post a Comment