नागपूर, दि. 28 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, मार्गदर्शक व कार्यकर्त्यांकडून ‘जिल्हा क्रीडा पुरस्कार 2018’ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
क्रीडापटूंचा गौरव व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे, क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने हा पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्कार श्रेणीत गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार, खेळाडूमध्ये महिला, पुरुष तसेच दिव्यांग खेळाडू याशिवाय जादाचा थेट पुरस्कार,दिव्यांग खेळाडू थेट पुरस्कार देण्यात येणार आहे. पात्र खेळाडूंना पुरस्कार स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रुपये दहा हजार देण्यात देईल. पात्र खेळाडूंनी 1जुलै ते 30 जून 2018 या कालावधीतील त्यांच्या कामगिरीचे दस्तावेज सादर करणे आवश्यक राहील.
अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ nagpursports.com वर संपर्क साधू शकतात. ऑनलाईन पद्धतीने सादर अर्जाची प्रत दिनांक 15 जानेवारीपर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक राहिल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment