Friday, 28 December 2018

रामटेक येथे आज बेरोजगार युवक-युवतींकरिता रोजगार मेळावा

             नागपूरदि. 28 : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थारामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारदिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बेरोजगार युवक-युवतींकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रामटेक येथील खैरी बिजेवाडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ घेण्यात येणार आहे.
एकदिवसीय मेळाव्यात मेसर्स सूर्यालक्ष्मी कॉटन मिल्स लि.जॉबकट्टामहिंद्रा एण्ड महिंद्राअल्ट्राटेक सिमेंटदि युनिवर्सल ग्रुप असोशिएशन अशा विविध भागातील 27 कंपन्या सहभागी होणार आहेत.
इयत्ता 10वीं, 12वींपदवीधरअभियांत्रिकीडिप्लोमाबी. फार्मटेक्नीकलनॉन-टेक्नीकलआयटीआयबी. ई.बी.टेक फूड टेक्नॉलॉजी,बीएस्सीएम.एस्सीमाईक्रोबॉयलॉजी ही शैक्षणिक पात्रता असणारे बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. पात्र उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रासह जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.
****

No comments:

Post a Comment