नागपूर, दि. 30: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक व
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळणारे परीक्षा
प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात
आले आहे. यासाठी मंडळाच्या या www.mahasscboard.in अथवा www.mahasscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बुधवार दिनांक 30 जानेवारीपासून स्कूल लॉगिंगमध्ये
डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध झाले आहे. सर्व माध्यमिक शाळांनी ही प्रवेशपत्र
डाऊनलोड करुन त्याच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यायच्या आहे. त्यासाठी
शाळांनी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क वसूल करु नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून
त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का व स्वाक्षरी करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहे.
जर प्रवेशपत्रात फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख अथवा जन्मस्थळ
यासंदर्भात दुरुस्त्या असल्यास शाळांनी त्यांच्या स्तरावर दुरुस्ती करुन त्याची
प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ
झाल्यास शाळांनी त्याची पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा
शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावे, असे आवाहन सचिव रविकांत देशपांडे
यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment