नागपूर, दि. 30: विभागीय चाचा नेहरु बाल
महोत्सवाचे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते आज
ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदांनावर क्रीडाज्योत पेटवून उद्घाटन करण्यात
आले.
यावेळी व्यासपीठावर राज्य बालहक्क संरक्षण
आयोगाच्या सदस्या श्रीमती वासंती देशपांडे, महिला व बालविकासच्या विभागीय उपायुक्त एम.
डी. बोरखडे,
बालकल्याण
विभागाच्या सदस्या श्रीमती अंजली विटणकर, ॲड सुरेखा बोरकुटे, संजय पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंह
परदेशी,
रमेश
टेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विभागातील
महिला व बाल विकास विभार्गांतर्गंत शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल
झालेल्या अनाथ,
निराधार, उन्मार्गी बालकांमधील सुप्त गुणांना वाव देऊन
त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना व व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी विभागीय
चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित करण्यात येतो.
यावेळी
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कु. विशाखा, कु. भाग्यश्री, कु. ऋणाली, कु. हेमा, सरफराज, श्यारीन आणि ज्योती यांना मान्यवरांच्या
हस्ते अनाथ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विभागीय चाचा नेहरु बालमहोत्सव
2018-19 चे उद्या गुरुवार दि. 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता बक्षीस वितरण
समारंभ होणार आहे.
******
No comments:
Post a Comment