Wednesday, 10 April 2019

सहाय्यकारी 47 मतदान केंद्रांना आयोगाची मान्यता


नागपूरदि. 10 लोकसभेच्या नागपूर व रामटेक मतदार संघामध्ये 1 हजार 400 पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांमध्ये वाढ करुन 47 सहाय्यकारी  मतदान केंद्रांना निवडणूक आयोगामार्फत मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून मान्यता मिळालेल्या मतदान केंद्रांमध्ये नागपूर लोकसभा मतदार संघाचे  28 मतदान केंद्रांचा समावेश आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघाचे मतदारसंघातील सहाय्यकारी मतदान केंद्रामध्ये 118-अ सुभाषनगर, 121-अ सुभाषनगर, 170-अ खामला, 174-अ स्वावलंबीनगर, 201-अ जयताळा, 319-अ जोगीनगर यांचा समावेश करण्यात आला आहे.  नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघात सहाय्यकारी मतदान संघामध्ये 169-अ मानेवाडा, 262-अ दिघोरी, 267-अ दिघोरी, 290-अ म्हाळगीनगर, 344-अ मानेवाडा यांचा समावेश करण्यात आला आहे.
पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात 67-अ पारडी, 104-अ पुणापूर हे दोन मतदान केंद्र सहाय्यकारी आहेत. तसेच पश्चिम विधानसभा मतदार संघात 195-अ मतदान केंद्र गड्डीगोदाम हे सहाय्यकरी मंजूर करण्यात आले आहे.
 उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघात 14 सहाय्यकारी मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये मतदान केंद्राच्या यादीतील क्रमांक 5-अ नारा, 6-अ नारा, 27-अ नारी, 37-अ नारी, 40-अ नारी, 70-अ नागसेननगर, 146-अ नारी, 154-अ चॉक्स कॉलनी, 159-अ सिद्धार्थ नगर, 161-अ सिद्धार्थ नगर, 178-अ राणी दुर्गावतीनगर, 184-अ यशोधरानगर, 186-अ यशोधरानगर व 248-अ यशोधरानगर यांचा समावेश आहे.
रामटेक लोकसभा मतदार संघात 19 सहाय्यकारी मतदान केंद्र

रामटेक लोकसभा मतदार संघात 1 हजार 400 पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांवर 19 सहाय्यकारी मतदान केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये सावनेर विधानसभा  मतदार संघात तीन मतदान केंद्र असून यामध्ये 109-अ गुजरखेडी, 273-अ, चिचोरी(खापरखेडा), 321-अ कळमेश्वर या केंद्रांचा समावेश आहे.
हिंगणा विधानसभा मतदार संघात तीन सहाय्यकारी मतदान केंद्र असून यामध्ये 51-अ गोधणी रेल्वे, 241-अ वानाडोंगरी व 280-अ ईसासनी यांचा समावेश आहे. उमरेड विधानसभा मतदान संघात 227-अ उमरेड. कामठी विधानसभा मतदार संघात 12 सहाय्यकारी मतदान केंद्र राहणार आहेत. यामध्ये 62-अ कामठी शहर, 108-अ कामठी शहर, 137-अ कामठी शहर, 140-अ कामठी शहर, 322-अ मारोडी, 364-अ पिपळा, 365-अ पिपळा, 362-अ बेसा, 375-अ बेलतरोडी, 376-अ बेलतरोडी, 377-अ बेलतरोडी व 408-अ हुडकेश्वर खुर्द या सहाय्यकारी मतदान केंद्रांचा समावेश आहे.
****

No comments:

Post a Comment