Saturday, 19 October 2019

मतदार ओळखपत्र नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य


            मुंबईदि. 19 : येत्या सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (ईपीक) नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
            मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी 11 पुरावे :  पारपत्र (पासपोर्ट)वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स)राज्य/केंद्र शासनसार्वजनिक उपक्रमसार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्रछायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुकपॅनकार्डराष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्डमनरेगा जॉबकार्डकामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्डछायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज (पीपीओ)खासदार,आमदारविधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्रआधारकार्ड यापैकी कोणत्याही एका पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.
००००

No comments:

Post a Comment