Saturday, 19 October 2019

‘आपलं मंत्रालय’चा निवडणूक विशेषांक प्रकाशित


मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह अंकाचे अतिथी संपादक
मुंबईदि. 19 : ‘आपलं मंत्रालयच्या सप्टेंबरच्या विधानसभा निवडणूक 2019’च्या विशेषांकाचे प्रकाशन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या हस्ते आज येथे झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदेमाहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहसंचालक (वृत्त/माहिती) सुरेश वांदिलेसायबर सेलचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकांचे औचित्य साधून प्रसिध्द करण्यात आलेल्या या विशेषांकात निवडणूक विषयक विविध माहितीपूर्ण लेखांचा समावेश आहे. आचारसंहिता म्हणजे कायआचारसंहिता काळात घ्यावयाची काळजीकाय करावेकाय करू नयेनिवडणूकीतील सोशल मीडियासी-व्हिजील अॅपनिवडणूक चिन्हनिवडणूकीत वापरली जाणारी शाईघ्यावयाची खबरदारीजनजागृती मोहीमनिवडणूक प्रक्रिया याबाबतच्या माहितीपूर्ण लेखांचा यात समावेश आहे.
००००

No comments:

Post a Comment