· शहरातीलसहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे लेखे तपासणी
नागपूर.दि.19 :नागपूर शहरातीलनागपूर पूर्व, मध्य, उत्तर, पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या तिसऱ्या निवडणूक खर्चाची लेखा तपासणी आज शनिवारी बचत भवन सभागृहातझाली. यामध्येएकूण चार उमेदवार अनुपस्थित राहिल्यामुळे तर निवडणूक खर्चात तफावत आढळलेल्या उमेदवारांनाहीसंबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीनोटीस बजावण्यात आली आहे.
नागपूर शहरातील पूर्व, मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक सुब्राज्योतीचक्रवर्ती आणि दक्षिण- पश्चिम, दक्षिण आणि पश्चिमचे प्रतीक कुमार हेआहेत.
त्यामध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 20, दक्षिण 17, पश्चिम 12 उमेदवारांपैकी दक्षिण आणि पश्चिममधून प्रत्येकी एक उमेदवार अनुपस्थित होता.तर नागपूर पूर्व8, मध्य 13 आणि उत्तर14 उमेदवारांपैकीउत्तर विधानसभा मतदारसंघातील 2उमेदवार निवडणूक खर्च लेखे सादर करण्यास उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले.
****
No comments:
Post a Comment