नागपूर दि.26 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पी.एम. किसान योजनेस पात्र लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक नसल्यामुळे पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक 30 नोव्हेंबरपर्यंत डाटा आधार लिंक करण्यासाठी मुदत दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत किसान योजनेमध्ये नोंद न झालेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी पी.एम.किसान पोर्टलवर फार्मर्स कॉर्नरमध्ये नव्याने शेतकरी नोंदणी (न्यू फार्मर रजिस्ट्रेशन) ची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
तसेच http://.www.pmkisan.gov.in/home.aspx या संकेत स्थळावर सीएससी लॉग-इन ह्या सुविधेमध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत लाभार्थ्यांना आधार दुरुस्ती व इतर सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आलेत. तरी सर्व लाभार्थ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत डाटा आधार लिंक करावे. याबाबत कोणतेही मुदतवाढ करण्यात येणार नाही याची सर्व लाभार्थ्यांनी दक्षता घ्यावी. यासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
*****