नागपूर, दि. 21 : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाई ते निमगुळ एसटी
बस अपघातातील मयत प्रवाश्यांच्या वारसांना रूपये दहा लाख प्रमाणे 11 प्रकरणी एकूण
1 कोटी रुपये व एसटी चालकास 7 लाख 18 हजार 960 रूपये तसेच जखमी प्रवाशांना 23 हजार
तात्कालीक आर्थिक मदत व नुकसान भरपाई मागणीस्तव पी फॉर्म देण्यात आले असल्याची
माहिती परिवहन मंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.
या संबंधीची लक्षवेधी सूचना
श्रीमती विद्या चव्हाण यांनी मांडली होती.
यावेळी श्री. देसाई म्हणाले, दिनांक 18 ऑगस्ट, 2019 रोजी शहादा आगाराची बस
औरंगाबाद-शहादा मार्गावर धावत असतांना सुमारे 22.35 वाजता निमगुळ गावाजवळ
तावखेडा फाटा येथे समोरुन भरधाव वेगात येणारा कंटेनर व बसची समोरासमोर धडक होऊन
अपघात झाला. या अपघातात बसमधील एकूण 52 प्रवाशांपैकी 11 प्रवाशी व 01 बसचा चालक
आणि त्रयस्थ कंटेनर वाहनाचा चालक 01 असे एकूण 13 व्यक्ती मृत झाल्या व
कर्तव्यावरील 01 वाहक व 38 प्रवाशी असे एकूण 39 व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमी
प्रवाश्यांना तातडीने उपचारार्थ शासकीय रुग्णालय दोंडाईचा शहादा, नंदुरबार व धुळे येथे व परिसरातील खाजगी रुग्णालयात
दाखल करण्यात आले होते. बसमधील 11 मयतांचे वारसांना प्रत्येकी रु. 10,000/-
प्रमाणे एकूण रु. 1,10,000/- व जखमी व्यक्तींना एकुण रु. 23,000/- एवढी तात्कालीक
आर्थिक मदत देण्यात आली. तसेच नुकसान भरपाईची मागणी करण्याचे पी फॉर्म देण्यात आले
आहेत. बसमधील मयत 11 प्रवाशांपैकी 10 प्रवाशांना राज्य परिवहन नियमांनुसार मयत प्रकरणी
प्रत्येकी रु. 10 लाख रक्कम देण्यात आली. मयत प्रवाशी श्री. इद्रिस नासिर मणियार
मु. पो. तळोदा यांचे वारसांचा वाद असल्याने त्यांनी अद्याप पी फॉर्म व कागदपत्रे
सादर न केल्याने त्यांना नुकसान भरपाई अदा झालेली नाही. पी फॉर्म व कागदपत्रे सादर
केल्यानंतर त्यांना त्वरीत नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात येईल. मयत रा. प. चालक
श्री. मुकेश नगीन पाटील यांना श्रमीक नुकसान भरपाई तरतुदीतर्गत रु. 7 लाख 18 हजार
960 एवढी आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. तसेच राज्य परिवहन नियमानुसार कामगिरीवरील
कर्मचारी यांचेकरीता अपघात सहाय्यता निधी योजनेअंतर्गत रु. 10 लाख किंवा त्यांचे
वारसांस नोकरी देण्यात येईल, असे श्री.
देसाई यांनी सांगितले.
या चर्चेत सदस्य सुधीर तांबे यांनी भाग घेतला.
0000
No comments:
Post a Comment