मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्य मंडळाची
385 वी बैठक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री आदिती तटकरे
यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
यावेळी उद्योग
विभागाचे सचिव भुषण गगराणी, उद्योग विभागाचे
मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एल.अनबलगन तसेच संबंधीत अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत
ठाणे औद्योगिक क्षेत्र, बारामती
औद्योगिक क्षेत्र, पिंपरी औद्योगिक क्षेत्र, चाकण औद्योगिक क्षेत्र भूखंडाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी
भूखंडाचे वाटप, भूखंडाचा करारनामा, भूखंडाचा ताबा, इमारत पुर्णत्वाचा
दाखला, भूखंडाचा अंतीम करारनामा, भूखंडाचे हस्तांतरण याबाबत चर्चा करण्यात आली.
००००
No comments:
Post a Comment