Tuesday, 18 February 2020

क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान


     नागपूर, दि. 18:  महाराष्ट्र उद्योग विकास केंद्र, नागपूरच्या वतीने  क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमां चे आयोजन दिनांक 23 ते 28 फेब्रुवारी 2020 दरम्यान उद्योग भवन येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग तसेच एनएसआयसी योजना, मार्केटिंग कौशल्ये, विक्री क्रिया, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, बाजारपेठेचे व्यवस्थापन, शासकीय व निमशासकीय कर्ज योजनांची  माहिती  विषयांवर तज्ज्ञ, अनुभवी व्यक्ती, अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
            उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या उद्योजकांनी प्रशिक्षण कार्यक्रमांच्या प्रवेशाकरिता तसेच अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक सुविद फडणवीस (7276490208) यांच्याशी  उद्योग भवन, पहिला माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे कार्यालयीन वेळेत  संपर्क साधावा, असे आवाहन चे  विभागीय अधिकारी  अलोक मिश्रा यांनी केले आहे.
******


No comments:

Post a Comment