·
राज्यातील
15 जिल्ह्यांचा सहभाग
·
नाबार्डतर्फे
महिला बचत गटांच्या वस्तूंना व्यासपीठ
नागपूर, दि.
18: राष्ट्रीय
कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) तसेच उत्कर्ष फाऊंडेशनच्या वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे
राज्यस्तरीय प्रदर्शन उद्या बुधवार दिनांक 19 ते 23 फेब्रुवारी दरम्यान बजाज नगर
येथील जेरिल लॉन येथे आयोजित करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन
उद्या बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता गृहमंत्री अनिल देशमुख,
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत तसेच पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या प्रमुख
उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक
यू.डी. शिरसाळकर, आमदार विकास ठाकरे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जि. प. अध्यक्ष
रश्मी बर्वे, एमएसएमईचे संचालक पी. एम. पार्लेकर, नाबार्डच्या जिल्हा विकास
प्रबंधक मैथिली कोवे आदी उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनात राज्यातील 15 जिल्ह्यातील
महिला बचत गट सहभागी होतील. यासाठी
जिल्ह्यातून 50 तर इतर जिल्ह्यातून 35 महिला बचत गटांनी नोंदणी केली आहे.
प्रदर्शनात जीएसटी, सरकारच्या योजनांनी माहिती, मार्केटिंग, पॅकेजिंगसह अनेक
विषयांवर कार्यशाळा होणार आहे.
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला
सक्षमीकरणाचे काम राज्यात झाले आहे. यातून
महिलांना रोजगाराही मिळाला असून काही महिला मोठ्या उद्योजिकाही बनल्या आहेत. मात्र
ग्रामीण भागातील महिला मार्केटिंगमध्ये कमी पडतात. त्यांना या प्रदर्शनाच्या
माध्यमातून आपल्या वस्तूंची जगभरात ओळख करुन देण्याची संधी मिळणार आहे. प्रदर्शनात
बचतगटातील उत्पादन सामुग्रीचे स्टॉल्स राहतील.
सुमारे 60 प्रकारच्या वस्तू प्रदर्शनात राहतील. यामध्ये ग्रामिण भागातील
बचत गट , संयुक्त देयता समुह( जेएलजी), ग्रामिण कारागीर निर्मित कलाकृती, आकर्षक
जीवनोपयोगी वस्तू यांचे प्रदर्शन व विक्रीसह महाराष्ट्रीय व्यंजन व खाद्यपदार्थांची
रेलचेल राहणार आहे. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन
मैथिली कोवे यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment