· नागपूर अमरावती विभागाचा जिल्हानिहाय आढावा
· फळबाग योजनेचे लाभार्थी वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश
नागपूर, दि. 20 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत शेतीला सहाय्यभूत ठरतील अशा कामांना प्राधान्य देतानाच अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिलेत.
मग्रारोहयो योजनेमध्ये निधी उपलब्ध असून सिंचन विहिरी फळबाग योजना आदी विकास कामांना प्राधान्य द्या. असेही श्री. भामरे यांनी यावेळी सांगितले.
नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे नागपूर व अमरावती विभागाचा ‘मग्रा रोहयो’चा आढावा श्री. भुमरे यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नरेगा आयुक्त ए. एस. आर. नायक, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, भुवनेश्वरी एस., सचिन ओम्बासे, उपायुक्त मनीषा जायभाये, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे तसेच अमरावती विभागातील
संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात असलेली कुशल व अकुशल मजुरांची संख्या, मनरेगाचा आर्थिक प्रगती अहवाल, आर्थिक वर्ष 2017-18 व त्यापूर्वीची
अपूर्ण कामे, कामाची सद्यस्थिती, अपूर्ण कामाची वर्गवारी, फळबाग लावगड, सिंचन विहीर, रस्ते, पालकमंत्री पाणंद रस्ते, वृक्ष लावगड व रोपवाटीका, आर्थिक वर्षनिहाय अपूर्ण कामे ग्रामपंचायत, वनीकरण, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग आणि इतर विभागांतर्गंत रोजगार हमी योजनेतून सुरु
असलेली कामे यांचा रोहयोमंत्री श्री. भुमरे यांनी आढावा घेतला.
जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची अपूर्ण माहिती
आणल्यामुळे श्री. भुमरे यांनी नाराजी व्यक्त करताना जिल्हानिहाय बैठकांवेळी
परिपूर्ण माहिती सोबत आणावी. रोहयो
अंतर्गत
विभागातील सुरु असलेली कामे, खर्च होणारा निधी, येणा-या अडचणी, आदी
बाबींबाबत समन्वय ठेवून ही कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याची
सूचना करताना ते पुढे म्हणाले की, पालकमंत्री पांदण, शेत रस्ते जलसंधारणातंर्गंत नाला खोलीकरण व सरळीकरणातून
रस्ते निर्मिती व जलसंधारण अशी दुहेरी कामे करण्याबाबत यावेळी सूचना केल्यात.
विदर्भातील विविध जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांमधील जेसीबी आणि पोकलँड आदी
यंत्रसामुग्री वापराबाबतच्या दरपत्रकात तफावत असून
ते निश्चित करावेत. त्यासाठी
स्थानिक यंत्रसामुग्री असण्याचा अट्टाहास न धरता वेळेत कामे पूर्ण करण्याला
प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच नाविण्यपूर्ण कामांमध्ये वर्धा
जिल्ह्यात 14 ग्रामपंचायतीमध्ये ऑक्सिजन
पार्क उभारणी तसेच चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात अभिसरणांतर्गंत केलेल्या
कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्याचा गेल्या तीन वर्षात 15 कोटी तर गतवर्षी 12 कोटीचा निधी खर्च झाला असून, यंदा फक्त दीड कोटी रुपये खर्च झाल्याबाबत
नाराजी व्यक्त केली. यापुढे कारणे न देता कामाला प्राधान्य देण्याचे निर्देश
त्यांनी दिले. आर्णी व केळापूर तालुक्यातील 2013-14 पासून झालेल्या कामांची चौकशी करुन अहवाल सादर
करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये कृषी विभागाने
पांढरकवडा, झरी जामणी, मोरगाव, घाटंजी, नेर या तालुक्यांमध्ये कामे थांबविली असून, फळबाग वाढीकडे लक्ष देत ते सुरु करण्याचे
निर्देश दिले. जिल्ह्यातील भूसंपादनाचा निधी असल्यामुळे तो प्रश्न तात्काळ मार्गी
लावावा. विदर्भात कामे चांगली सुरु असली तरी काही भागातील कामांची गती वाढवून ती
वेगाने पूर्ण करण्याबाबत निर्देशही श्री. भुमरे यांनी
सांगितले.
पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील सिंचन विहिरींबाबत
आढावा घेताना कुपनलिका असलेले लाभार्थी मिळत नसल्यास ते बदलून योजना प्रभावीपणे
राबवाव्यात. पूर्ण झालेल्या सिंचन विहिरींचे जिओ टॅगींग करावे. तसेच जलसंधारणातून
नाला खोलीकरण व सरळीकरण करताना बी.
जे. एस. आदी एनजीओंची मदत घ्यावी.
त्यातून शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर करावीत. रोहयो व फलोत्पादन मंत्री
संदिपान भुमरे यांनी तुती लागवड क्षेत्र वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी
अधिका-यांना केल्या.
******
No comments:
Post a Comment