विभागीय आयुक्त कार्यालयात
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
नागपूर, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज
विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त चौकशी अधिकारी शैलेंद्र मेश्राम यांनी
त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसिलदार प्रताप
वाघमारे, सहसंचालक कमलकिशोर राठी तसेच
कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालय
छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, अतिरिक्त
जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे,
रविंद्र कुंभारे, जिल्हा पुरवठा अधिकारी
भास्कर तायडे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
******
No comments:
Post a Comment