·
आदिवासी विकास विभागाचा खुलासा
·
आवेदन न करण्याचे आवाहन
नागपूर, दि.04 : आदिवासी विकास विभागाच्या महापोर्टलवर मुंबई,
पुणे, नाशिक आणि जळगाव या ठिकाणावरील सहा विविध पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करुन
ऑनलाईन आवेदन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, ही जाहिरात आदिवासी विकास विभागाची
नसून कोणीही या फसव्या जाहिरातीच्या पदासाठी अर्ज वा पत्रव्यवहार करु नये, असे
आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी केले आहे.
नाशिक
येथील आदिवासी विकास विभाग, आयुक्तांच्या अधिनस्त असलेल्या अपर आयुक्त नाशिक,
ठाणे, नागपूर व अमरावती तसेच त्यांच्या अधिनस्त 29 प्रकल्प अधिकारी यांच्याकडून
अशी कोणतीही जाहिरात काढण्यात आलेली नाही किंवा प्रकाशित करण्यात आलेली
नाही.कोणीतरी अत्यंत खोडसाळपणे आणि गैरहेतूने आदिवासी विकास विभागाला बदनाम
करण्याच्या हेतूने ही खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्याशी
आदिवासी विकास विभागाचा कुठलाही संबंध नाही. तसेच याबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प नागपूर यांनी सिताबर्डी पोलिसांकडे 27 फेब्रुवारी रोजी
तक्रार दाखल केली आहे.
तरी
या बोगस आणि खोट्या जाहिरातीला बळी पडू नये. अर्ज करण्यास कोणी प्रवृत्त करत असेल
त्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करावी. तसेच या विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन
प्रकल्प अधिकारी श्री . चव्हाण यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment