Saturday, 7 March 2020

ट्रामा केअर सेंटरच्या अद्यावतीकरणासाठी निधीची उपलब्धता - आरोग्य मंत्री टोपे

             

        नागपूर दि. 7 :  ग्रामीण रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी काटोल येथील सर्व सोयींनीयुक्त अशा ट्रामा केअर सेंटरला आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल,असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. काटोल येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
     राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभियेमुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादवआरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. व्ही. पातूरकर उपस्थित होते. 
            ट्रॉमा केअर सेंटरसाठी लागणारा निधी राष्ट्रीय आरोग्य मिशनमधून देण्यात येईल. 50 खाटांच्या रुग्णालयात भूलतज्ज्ञांची संख्याच कमी असते. त्यामुळे या भागातील भूलतज्ज्ञांची सेवा घेता येईल, असे सांगून लवकरच कायमस्वरुपी पद भरण्याच्या सूचना श्री. टोपे यांनी दिल्या. काटोलनरखेड येथील ग्रामीण रुग्णालयांसाठी निधीची अडचण नाही. सार्वजनिक बांधाकाम विभागाने रुग्णालयाचे अंदाजपत्रक पाठवून त्याचा पाठपुरावा करावा. तसेच 102 च्या जुन्या रुग्णवाहिका बदलण्यासाठी विभागाकडून निधी देण्यात येणार आहे. सोबतच आरोग्य केंद्रांना 108च्या रुग्णवाहिका पुरविण्यात येतील. नरखेड ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगबालरोग आणि अस्थिरोगतज्ज्ञाची पदे लवकरच भरणार असल्याचे श्री. टोपे म्हणाले.                                  
            ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून  या केंद्रात भूलतज्ज्ञ नियुक्त करावा, असे सांगून येत्या तीन महिन्यात विशेष तज्ज्ञ डॉक्टर, टेक्निशियनशिपाई यांचीही पदभरती केली जाणार असल्याचे  ते म्हणाले.   
            नरखेड ग्रामीण रुग्णालय इमारत नादुरुस्त  असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तिचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. इमारतीचे नव्याने बांधकाम करायचे असल्यास तसा  प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले. कोंढाळी उपकेंद्रासाठी 4.33 कोटीचे नव्याने अंदाजपत्रक तयार आहे. त्याचा पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी आदेश दिले. कचेरी सावंगा येथील रुग्णालयाचे पूर्णत: नव्याने बांधकाम करण्यासाठी एनएचएममधून निधी उपलब्ध करून देणार असल्याची  ग्वाही श्री. टोपे यांनी दिली.
*********

No comments:

Post a Comment