Monday, 20 April 2020

कोविड-19 टास्कफोर्स फोरम समवेत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची चर्चा


नागपूर, दि.20 :  कोविड-१९ टास्कफोर्स फोरम सोबत कोविड-१९ च्या अडचणी व त्यावर उपाय या संबंधी जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे चर्चा करण्यात आली.  या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, ग्लोबल बायोटेक फोरमचे डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. अशोक डोंगरे, डॉ. वढ़े व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूच्या बाबतीत अद्यापही ठोस असे संशोधन पुढे आले नाही. त्याकरिता संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सामान्य लोकांशी संवाद साधावा. त्यांनी यावेळी ॲन्टी बॉडी टेस्टींग म्हणजे काय व ती किती फायदेशीर आहे, त्याचे फायदे काय या संबंधी पालकमंत्र्यांनी संबंधितांशी चर्चा केली.
******

No comments:

Post a Comment