नागपूर दि, 20 : लॉकडाऊनच्या काळात
अन्नधान्य वितरणात कोणत्याही पध्दतीची अडचण येणार नाही याची दक्षता घेतानाच
अन्नधान्य वितरणातील तक्रारीचे तात्काळ निवारण करण्याचे निर्देश पालकमंत्री
डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. राऊत
यांना उत्तर नागपूर भागात अन्नधान्य वितरणात अडचण येत असल्याची तक्रार प्राप्त
झाली. त्यावर पालकमंत्र्यांनी तात्काळ या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी रविंद्र
ठाकरे व संबधीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
लॉकडाऊनच्या काळात शासनामार्फत अंत्योदय,
प्राधान्य कुटुंब व केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्यात येत आहे. धान्य
वाटपावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*****
No comments:
Post a Comment