नागपूर, दि.20 : लॉकडाऊन काळात हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी मदतीचा हात
म्हणून टिळक पत्रकार भवन येथे
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे हस्ते आज अन्नदान करण्यात आले.
मॉयल
लिमिटेड,
नागपूर
तसेच टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने धंतोली येथील टिळक पत्रकार भवनाच्या प्रांगणात लॉकडाऊन संपेपर्यंत अन्नदान सुरू
ठेवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ सुमारे 300 नागरिक दररोज घेत आहेत.
सोशल डिस्टसिंगचे योग्य
पालन करीत पालकमंत्र्यांच्या हस्ते लहान मुले, महिला, गरीब कामकरी मंडळींना यावेळी
अन्नदान वाटप करण्यात आले. ‘मॉइल’चे अध्यक्ष मुकुंद चौधरी, संचालक दिपांकर शोम, राकेश तुमाने,टिळक पत्रकार भवनचे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र,नागपूर श्रमिक पत्रकार
संघटनेचे सरचिटणीस ब्रम्हाशंकर त्रिपाठी, विश्वस्त प्रभाकर दुपारे यावेळी उपस्थित होते.
लॉकडाऊन कालावधीत
नागरिकांनी शासनाने जारी केलेल्या
सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य आहे. आवश्यक व्यवहार सोशल
डिस्टन्सिंग ठेवूनच करावे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा नियमित वापर व स्वच्छतेची योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी
यावेळी दिले.
गरजू, निराधार व्यक्तींपर्यंत
अन्नधान्य तसेच अन्नदान करण्यासाठी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेणाऱ्या सामाजिक
संस्थांचे पालकमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले.
*****
No comments:
Post a Comment