नागपूर,
दि. 22 : कोरोना बाधित रुग्णांवर प्रभावी व परिणामकारक उपचारामुळे भारतात सर्वाधिक
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित 409 नागरिकांपैकी
299 रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. कोरोनामधून सरासरी 74 टक्के रुग्ण
बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली.
रुग्ण
उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण भारतात 40.4 टक्के तर राज्यात 26.3 टक्के एवढे
असून त्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात तसेच
देशातही सर्वाधिक आहे.
कोरोना
बाधितांच्या तपासणीसह उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे स्वतंत्र कोविड वॉर्ड तयार करण्यात आला.
त्यासोबतच उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू चोवीस तास उपलब्ध असल्यामुळे कोरोना
बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
कोरोना
संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी शहरात पाच अत्याधुनिक प्रयोगशाळा असून यामध्ये
शहरातील 9 हजार 818
स्वॅबच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.
कोरोना
बाधितांमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये जगात सर्वाधिक जर्मनी येथील रुग्ण बरे
होण्याचे 87.9, इटली 53.3, फ्रान्स 34.9, अमेरिका 23.3, रशिया 27.7 आहे. भारतात
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 40.4 टक्के तर
महाराष्ट्रात 26.3 टक्के एवढी आहे. त्या तुलनेत नागपूर शहरात पूर्ण बरे
होण्याचे प्रमाण 74 टक्के असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
***
No comments:
Post a Comment