विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना धनादेश प्रदान
नागपूर, दि. 4: विदर्भ रिलीफ समितीच्या मदतीसाठी एन. पी. के. साळवे
वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र तसेच लता
मंगेशकर रुग्णालय यांच्यातर्फे 7 लाख 31 हजार
376 रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांना देण्यात आला.
विभागीय आयुक्त कार्यालयात लता मंगेशकर रुग्णालय व वैद्यकीय
महाविद्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. आशीष देशमुख
याच्या उपस्थितीत अधिष्ठाता डॉ. सजल
मित्रा यांनी मदतीचा धनादेश विभागीय आयुक्त यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी वैद्यकीय
महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागाचे
संचालक डॉ.
धानोरकर, संयुक्त
सचिव कमांडर नटराजन आदी उपस्थित होते.
कोविड रुग्णासाठी वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र
विभाग तयार करण्यात आला आहे,
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना सर्व सुविधांची माहिती डॉ. आशीष देशमुख यांनी दिली, तसेच या संदर्भातील
निवेदन पालकमंत्री डॉ. राऊत
यांना देण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment