Friday, 5 March 2021

समुपदेशन पारदर्शक पध्दतीने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदोन्नती नागपूर, दि. 5 : जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडून संनियंत्रीत चतुर्थश्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायक वर्ग-3 पदावर सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाच्या तरतूदी विचारात घेवून पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये 48 परिचारकांना कनिष्ठ सहायक लिपीक वर्गीय पदावर तर 3 परिचारकांना कनिष्ठ सहायक लेखा पदावर पदोन्नती देण्यात आली. एकूण 51 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत पारदर्शक पध्दतीनुसार समुपदेशन पदोन्नतीने पदस्थापना प्रक्रिया पार पडली. पदोन्नत कर्मचाऱ्यांमध्ये 13 दिव्यांग कर्मचाऱ्यांना समुपदेशनात प्रथमसंधी देण्यात आली. समुपदेशनाचे दिवशीच पदोन्नत कर्मचाऱ्यांना समुपदेशनाच्या ठिकाणी पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. समुपदेशाचे ठिकाणी कोविड-19 च्या अनुषंगाने सुरक्षित अंतर ठेवण्याचे पालन करुन पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पडली. 00000

No comments:

Post a Comment