Sunday, 29 December 2024

निवृत्तीवेतनधारकांनी कोषागाराकडे प्रमाणित जीवन प्रमाणपत्र रजिस्टर सादर करण्याचे आवाहन

 

नागपूर, दि. 30 : जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी ज्या बँकामधुन निवृत्ती वेतन आरहित होते त्या शाखेकडून जीवन प्रमाण प्रत्राचे रजिस्टर प्रमाणित करण्याचे आवाहन, अपर कोषागारे (निवृत्त वेतन) अधिकारी यांनी केले आहे. 

निवृत्तीवेतनधारकांनी आप-आपल्या बँकाकडे पाठपुरावा करुन जीवन प्रमाणपत्राचे रजिस्टर प्रमाणित करण्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कोषागाराकडुन देण्यात आल्या आहेत. संबंधित बँकांना यापूर्वीच कोषागाराकडून मुदत देण्यात आली होती. निवृत्तीवेतनधारकांनी जीवन प्रमाणपत्राचे रजिस्टर प्रमाणित करुन कोषागारास सादर न केल्यास निवृत्तीवेतन अदा करण्यास विलंब होऊ शकतो, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

00000000

 

 

नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीसाठी दिल्लीत निःशुल्क ‘अभिरुप मुलाखत प्रशिक्षण’ महाराष्ट्र सदनात 4 जानेवारी ते 6 एप्रिल दरम्यान प्रशिक्षण

 

नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीसाठी दिल्लीत निःशुल्क अभिरुप मुलाखत प्रशिक्षण’

महाराष्ट्र सदनात 4 जानेवारी ते 6 एप्रिल दरम्यान प्रशिक्षण

नागपूर, दि. 30 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2024-25 उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील उमेदवारांसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने 4 जानेवारी ते 6 एप्रिल 2025 दरम्यान नवी दिल्ली येथील जुन्या महाराष्ट्र सदनात ‘अभिरुप मुलाखत प्रशिक्षण 2024-25’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक तथा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपुरचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगा' च्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2024-25 परीक्षेचा निकाल 8 डिसेंबर 2024 रोजी घोषित झाला असून मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने अभिरुप मुलाखत प्रशिक्षण 2024-25 कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमातंर्गत उमेदवारांसाठी अभिरुप मुलाखती सत्रांचे 4 जानेवारी ते 6 एप्रिल 2025 दरम्यान येणा-या प्रत्येक शनिवार व रविवारी दिल्लीतील जुने महाराष्ट्र सदन, कोपरनिकस मार्ग, मंडी हाऊस जवळ, नवी दिल्ली-110001 आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी www.iasnagpur.com तथा www.siac.org.in या संकेतस्थळावरील सविस्तर सूचना बघावी. अथवा चौकशी संदर्भात directoriasngp@gmail.com या ईमेलवर चौकशी करावी. संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक ०७१२-२५६५६२६ या दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्र. ९४२२१०९१६८ या क्रमांकावर संपर्क साधावा. तथा मुलाखती संदर्भातील प्रवेश अर्ज जुने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथील मुलाखत केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जासोबत  युपीएससीचे मुलाखत पत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र आणि  पासपोर्ट आकारातील फोटो आणावीत. तसेच प्रत्येक उमेदवारांनी मुलाखतीस येतांना D.A.F. च्या ०६ छायांकीत प्रती व एक पासपोर्ट फोटो न चुकता सोबत आणावेत, असे प्रसिद्धीप्रत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

                                              ००००

 

Friday, 20 December 2024

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ महारांगोळी अधिवेशनानंतर आठवडाभर सर्वांसाठी खुली

 




नागपूर, दि. 20 :  सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालयात साकारलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’वर आधारीत महारांगोळी विधीमंडळ अधिवेशनानंतरही सर्व सामान्यांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांनी दिली आहे.   

                 सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मुख्यमंत्री सचिवालय परिसरात विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांची शिबिर कार्यालये उभारण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर महारांगोळी याच परिसरात मुख्यमंत्री कार्यालयाच्या मागील भागात साकारण्यात आली आहे. 12 सेमी उंचीच्या डायसवर 288 फुट आकाराची (12 X24 फुट) ही सुबक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. येथे लाडक्या बहिणीची प्रातिनिधिक प्रतिकृती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकृती रेखाटण्यात आल्या असून खास शैलीतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही खास शब्द रचनाही रेखाटण्यात आली आहे. 

            प्रसिद्ध रांगोळी कलावंत सुनिल तरारे यांच्या नेतृत्वात नागपूर व यवतमाळ येथील एकूण पाच कलाकारांनी  60 किलो रांगोळीद्वारे ही महारांगोळी साकारली आहे. 

                                                                        00000

मंत्री चंद्रकांत पाटील यांची सुयोग येथे सदिच्छा भेट

नागपूर, दि. 20 : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवास येथे सदिच्छा भेट दिली व पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. शिबिरप्रमुख प्रवीण पुरो, सहशिबिरप्रमुख तथा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी मंत्री श्री. पाटील यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना, शिक्षण शुल्क सवलत, विद्यार्थिनींसाठीच्या योजना, केंद्र व राज्य शासनाकडून शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणारे अनेक उपक्रम आदी बाबींची माहिती श्री. पाटील यांनी यावेळी दिली. राज्यातील विविध विषयावर त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. सुयोग येथे पत्रकारांसाठीच्या व्यवस्थेची पाहणी मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केली. प्रमोद डोईफोडे यांनी आभार मानले. 00000

पत्रकारिता क्षेत्राच्या विकासात दै. भास्करचे मोलाचे योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø दैनिक भास्कर नागपुरचा 22 वा वर्धापन दिन नागपूर,दि. 19 : भारत देश आणि राज्याच्या प्रगतीबरोबरच दैनिक भास्करने प्रगती साधत पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. या वृत्तपत्राने नागपुरात वेगळे स्थान निर्माण केले असून नागपूरकर
वाचकांना हे आपले वृत्तपत्र वाटते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. येथील सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये आयोजित दै. भास्कर नागपुरच्या 22व्या वर्धापन दिनाचे मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री नितेश राणे, आमदार सर्वश्री कृपाल तुमाने, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, विकास ठाकरे, विश्वजित कदम, दै. भास्करचे प्रधान संपादक मनमोहन अग्रवाल, समुह संपादक प्रकाश दुबे, संचालक राकेश अग्रवाल, संपादक मणिकांत सोनी आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भास्कर म्हणजे सूर्य. सूर्य जसा सर्वत्र प्रकाश देतो तसेच देशात कुठेही गेलो तरी सकाळी सर्वत्र दैनिक भास्करचे दर्शन घडते. मुंबईतही कमी वेळात या वृत्तपत्राने स्वतःची छाप सोडली. हे वृत्तपत्र ज्या-ज्या ठिकाणाहून प्रकाशित होते तेथील संस्कृती, नागरिकांची आवड लक्षात घेवून वाचकांपुढे येते. दैनिक भास्करचा दांडिया उत्सव, गणेशोत्सवातील महा लड्डू प्रसिद्ध असल्याचे सांगत या वृत्तपत्राने संपादकीय आणि व्यावसायिक विभाग पूर्णपणे वेगळा ठेवून कार्य केल्याचे यांनी अधोरेखित केले. उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, दै. भास्करने 2002 मध्ये नागपूर येथून महाराष्ट्रातील आवृत्तीचा प्रारंभ केला. राज्यात या वृत्तपत्राच्या विविध आवृत्त्या सुरु झाल्या असून पत्रकारितेत या वृत्तपत्राने केलेले नवनवीन प्रयोग उल्लेखनीय आहेत. विविध क्षेत्रात सेवाभावाने कार्य करणाऱ्या सात व्यक्तींचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुंभमेळ्याच्या माहितीवर आधारित दै. भास्कर द्वारा निर्मित "महाकुंभ प्रयागराज" पुस्तकाचे विमोचनही त्यांच्या हस्ते पार पडले.

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त नागपूर,दि. 19 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरीत्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर - अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते. श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला. आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रिम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला. ००००००

शासन योजनांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी मोबाईल पत्रकारिता महत्वाची - ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन

नागपूर,दि. 18: आधुनिक माध्यमांच्या युगात मोबाईल पत्रकारितेच्या (मोजो) माध्यमातून शासन योजनांची प्रभावी प्रसिद्धी करता येईल यासाठी हे तंत्र आत्मसात करणे आवश्यक आहे, असे ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन यांनी आज सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांनी ‘माजो’ संदर्भात महत्वाच्या टिप्स दिल्या. माहिती संचालक कार्यालयात ‘मोजो’ संदर्भातील छोटेखानी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. संचालक डॉ. गणेश मुळे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी, माहिती अधिकारी, सहायक संचालक, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर आणि वृत्त विभागाशी संबंधित कर्मचारी, या प्रशिक्षणास उपस्थित होते. मोबाईल कॅमेरा वापरतांना प्रकाश, ग्रीड लेवल, ऑडियो, बॅकग्राउंड यासह विविध कॅमेरा अँगलचा उपयोग करुन ध्वनी चित्रफित बनविण्याचे तंत्र यावेळी श्रीमती चंद्रन यांनी समजावून सांगितले. विविध प्रसंगाचे वार्तांकन करतांना वापरावयाची आवश्यक मोजो किट, सहाय्यभूत ठरणारे मोबाईल अप्लिकेशन आणि विविध उपकरणांची माहिती दिली. मोबाईलवर चित्रित करण्यात आलेल्या फुटेजचे संपादन करण्याची पद्धती आणि त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरचा वापर याबाबतही त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. मोजोचा प्रभावी वापर करण्यासाठी काय करावे आणि काय करु नये याचेही सविस्तर विवेचन त्यांनी यावेळी केले. उपस्थितांनी मोजोबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांची उदाहरणासह माहिती देवून प्रतिभा चंद्रन यांनी उत्तरे दिली. मोजोची बलस्थाने व त्याचा नेटका वापर करुन प्रभावी प्रसिद्धी करण्याच्या विविध टिप्स त्यांनी दिल्या. तत्पूर्वी संचालक डॉ. गणेश मुळे यांनी प्रस्ताविकात प्रशिक्षणामागील मनोदय व्यक्त केला. वर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांनी आभार मानले. अधिपरिक्षक पुस्तके व प्रकाशने कार्यालयातील सहायक संचालक ईरशाद बागवान, सहायक संचालक संतोष तोडकर उपस्थित होते. 000000

लोकराज्य दुर्मिळ अंकाचे डिजीटायजेशन व्हावे - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

विधानभवन परिसरात ‘लोकराज्य दुर्मिळ अंक’ प्रदर्शनाचे उद्घाटन  मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन केले कौतुक नागपूर, दि. 16 : लोकराज्य दुर्मिळ अंक हे माहितीचा अमुल्य ठेवा असून त्याचे जतन व संवर्धन होण्याकरिता या अंकांचे डिजीटायजेशन व्हावे, अशा सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज विधानभवन परिसरात लावण्यात आलेल्या लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. नागपूर-अमरावती विभाग संचालक कार्यालयाच्या वतीने लावण्यात आलेल्या या प्रदर्शनास मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन राज्याच्या गौरवशाली परंपरेच्या माहितीचा ठेवा असणाऱ्या या प्रदर्शनाचे कौतुक केले. उद्घाटन प्रसंगी नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, लोकराज्यचे संपादक तथा माहिती संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे संचालक किशोर गांगुर्डे, वरिष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, वर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी यावेळी उपस्थित होते. महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच या दुर्मिळ अंकांचा ठेवा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजीटायझेशन आणि अन्य आधुनिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. दुर्मिळ अंकांच्या मांडणीचे कौतुकही त्यांनी केले. प्रदर्शनात वैविद्यपूर्ण माहितीचा ठेवा असणारे दुर्मिळ अंक 1964 पासूनचे अंक येथे लावण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित अंक, मराठी संगीत रंगभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, मराठवाडा विकास व सांस्कृतिक अंक, स्वातंत्र्यदिन विशेषांकासह महाराष्ट्र राज्यातील महान व्यक्तीमत्वे, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक असा वैविद्यपूर्ण ठेवा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे 150 अंक याठिकाणी लावण्यात आले आहेत. मान्यवरांच्या भेटी व सेल्फी स्टँडवर छायाचित्रे विधीमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने विधानभवन परिसरात विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची लगबग होती. वाटेतच लोकराज्य दुर्मिळ अंकांचे आकर्षक प्रदर्शन दिसताच त्यांनी भेट दिली. यावेळी पाहणी करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या. याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी स्टँडवर पोज देऊन छायाचित्रेही काढून घेतली. भेट देणाऱ्यांमध्ये मंत्री, ॲड. आशिष जायस्वाल, आमदार सर्वश्री प्रविण दरेकर, चित्रा वाघ, बाबुसिंग राठोड, अबु आझमी, श्रीजया चव्हाण, सुहास बाबर, देवराव भोंगळे यांचा समावेश आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, वनविभागाचे उपसचिव विवेक होशिंग, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धिरज अभंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रदर्शनास भेट दिली. अधिवेशन कालावधीमध्ये दररोज सकाळी 9 वाजता पासून ही पाहण्यास उपलब्ध राहणार आहे. 00000

Wednesday, 18 December 2024

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

Ø नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान Ø आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त नागपूर,दि. 18 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरीत्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर - अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते. श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला. आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रिम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला. ००००००

Sunday, 15 December 2024

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची ‘सुयोग’ ला भेट

नागपूर,दि. 15: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त सुयोग पत्रकार सहनिवास येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली व पत्रकारांशी संवाद साधला. विधीमंडळाचे प्रधान सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते. शिबिर प्रमुख प्रवीण पुरो व नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी उपसभापती डॉ गोऱ्हे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिबिर सहप्रमुख प्रमोद डोईफोडे, मराठवाडा विभागाचे माहिती संचालक किशोर गांगुर्डे, विधीमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने आदी उपस्थित होते. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. अधिवेशनानिमित्त करण्यात आलेली तयारी, कार्यक्रम, अनेक सुविधा आदी बाबींची माहिती त्यांनी दिली. विधीमंडळाचे यु ट्युबद्वारे होणारे प्रक्षेपण अधिक प्रभावी करण्यासाठी निश्चित प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी सुयोग पत्रकार सहनिवास येथील सभागृह, निवास कक्ष, माध्यम कक्ष, भोजनगृह आदी व्यवस्थेची पाहणी केली. 00000

मुख्यमंत्री सचिवालयात साकारतेय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ महारांगोळी

Ø १२ X२४ फुट आकार आणि ६० किलो रांगोळी पासून निर्मिती
नागपूर, दि. 14 : राज्य शासनाची महत्वाकांक्षी महिला सक्षमीकरणाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’वर आधारीत महारांगोळी येथील सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालयात साकारली जात आहे. विधान भवनाच्या पोर्चमध्येही याचीच एक प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मुख्यमंत्री सचिवालय परिसरात विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांची शिबिर कार्यालये उभारण्यात आली आहेत. याच परिसरात मुख्यमंत्री कार्यालयाच्या मागील भागात १२ सेमी उंचीच्या डायसवर १२ X२४ फुट आकाराची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर आधारीत रांगोळी साकारण्यात येत आहे. लाडक्या बहीणीची प्रातिनिधिक प्रतिकृती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या प्रतिकृती रेखाटण्यात येत असून खास शैलीतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही खास शब्द रचनाही रेखाटण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी उपअभियंते आणि गेल्या ४५ वर्षांपासून रांगोळी कलाकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सुनिल तरारे यांच्या नेतृत्वात नागपूर व यवतमाळ येथील एकूण पाच कलाकार ही महारांगोळी साकारत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सलग 13 तास हे कलाकार या रांगोळीचे आरेखन आणि रंगसंगतीचे कार्य करीत आहेत. १५ डिसेंबर पर्यंत ही रांगोळी तयार होणार आहे. याठिकाणी कार्यालयीन व परिसर स्वच्छतेत मग्न असणाऱ्या महिला कामगार कामातील उसंत मिळताच या रांगोळीची अवलोकन करुन कौतुक व सेल्फी घेत असल्याचे उत्साही चित्र दिसून येत आहे. या रांगोळीची अवलोकन व सेल्फी काढणे सोयीचे व्हावे यासाठी रांगोळी शेजारी दीड फुट उंचिचा डायस उभारण्यात आला आहे. विधानभवनाच्या मुख्य पोर्च मध्येही हाच कालाकारांचा चमू ४ X ६ फुट आकारातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’वर आधारीत रांगोळी साकारणार आहे. 00000

Wednesday, 11 December 2024

अधिवेशनासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्था तत्काळ पूर्ण करा - विजयलक्ष्मी बिदरी

 हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात  विधानभवन, हैद्राबाद हाऊस, रविभवन येथील व्यवस्थेची पाहणी  अधिवेशनासंदर्भात संपूर्ण माहिती ॲपवर उपलब्ध  व्यवस्थेमध्ये तृटी राहणार नाही, याची खबरदारी घ्या नागपूर,दि. 11: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबर पासून नागपूर येथे सुरु होत आहे. अधिवेशनासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तसेच विधानभवन परिसरात प्रशासनातर्फे करावयाच्या व्यवस्था तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले. श्रीमती बिदरी यांनी विधानभवन, हैद्राबाद हाऊस तसेच रविभवन येथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. विविध यंत्रणांनी समन्वय ठेवून 12 डिसेंबर पर्यंत संपूर्ण व्यवस्था पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे तसेच या परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग तसेच इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, विधिमंडळ सचिवालयाचे कक्ष अधिकारी श्री. पजारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार, उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये, विद्युत विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. मानकर, शाखा अभियंता संदीप चापले, रवीभवनचे राहुल ठाकुर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. विधनपरिषद व विधानसभेच्या सभागृहात करण्यात आलेली आसन व्यवस्था, नव्याने बसविण्यात आलेली मल्टीमिडीया कॉन्फरन्स सिस्टीमची पाहणी, पक्ष कार्यालय, भोजनगृह आदी व्यवस्थेसोबत परिसराची पाहणी करतांना श्रीमती बिदरी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या सुचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. विधानभवन, आमदार निवास तसेच रविभवन परिसरात तीन हिरकणी कक्ष तयार करण्यात येणार आहेत. या कक्षात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले. हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्र्यांचे सचिवालय, मुख्य सचिव यांचे कार्यालय तसेच विविध मंत्रालयीन विभागांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कार्यालयांमध्ये बैठक व्यवस्थेसह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रवीभवन येथील सभापती, अध्यक्ष, उपसभापती, विरोधी पक्षनेते यांची निवासस्थान तसेच या परिसरातील मंत्र्यांची निवासस्थाने व कार्यालयांसाठी प्रशानासतर्फे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या विविध सुविधांची माहिती घेतली. अधिवेशना संदर्भातील व्यवस्थेची माहिती ॲपवर विधिमंडळ अधिवेशना निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सर्व सुविधांसदर्भात माहिती ॲपवर उपलब्ध होणार आहे. तसेच रेल्वे स्टेशन व विमानतळावर हेल्पडेस्क तयार करुन बाहेरुन येणाऱ्या सदस्यांना तसेच अभ्यागतांना व्यवस्थेसंदर्भातील माहिती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसात संपूर्ण व्यवस्थेला अंतिम रुप दिल्या जाईल त्यादृष्टिने कामाचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागतर्फे करण्यात आलेल्या निवास व्यवस्थेंसदर्भात माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून संपूर्ण व्यवस्थेसंदर्भात माहिती क्युआर कोडद्वारा उपलब्ध राहणार आहे. गुगल मॅपवर स्थळदर्शन नकाशा तयार करण्यात आला असून बाहेरुन येणारे अभ्यागत तसेच वाहन चालकांनाही क्युआर कोडद्वारा संपुर्ण माहिती मिळणार आहे. व्यवस्थेसंदर्भात येणाऱ्या तृटी व अडचणीची तक्रारसुध्दा क्युआर कोडद्वारे स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 000000

Tuesday, 10 December 2024

केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या प्रसिद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करूया - संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे

 नागपुरातील पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्यांसोबतच चर्चा नागपूर,दि 10 : केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध महत्वाकांक्षी योजनांना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार आज पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या (पीआरएसआय) सर्व सदस्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे विदर्भ विभागातील योजनांना प्रसिद्धी देण्यासाठी समन्वयाने काम करण्यासाठी सहकार्य करावे, अशा भावना माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी व्यक्त केल्या. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि पीआरएसआय यांच्या समन्वयाने केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी अनौपचारिक बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी पीआरएसआय चे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.पी.सिंग, नागपूर शाखेचे सचिव मनिष सोनी, डब्ल्युसिएलचे जनसंपर्क महाव्यवस्थापक पी. नरेंद्र कुमार, महामेट्रोचे अखिलेश हळवे, दूरदर्शनच्या रचना पोपटकर आणि मीनल पाठराबे, पीआयबीचे सौरव खेकडे, मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे शरद मराठे आदि उपस्थित होते. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विविध महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ गरजुंना मिळावा यासाठी आधुनिक प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर करून समन्वयाने व्यापक प्रसिद्धी करण्यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. एस.पी.सिंह यांनी पीआरएसआयच्या माध्यमातून विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, याबाबत आश्वस्त केले. पीआरएसआय तर्फे डॉ. गणेश मुळे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मनिष सोनी यांनी मानले. 00000

Friday, 6 December 2024

हरभरा पिकावरील कीड व्यवस्थापनाचा कृषी विभागाचा सल्ला

नागपूर,दि ६ : हरभरा पिकावरील शेंडे, पाने व रोप कुरतडणारी अळीच्या (कट कर्म) प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून या अळीच्या व्यवस्थापन व उपाययोजनेचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आला आहे. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकावर प्रामुख्याने कट कर्म या बहुभक्षीय अळीचा प्रादुर्भाव होतो. पिकाच्या कोवळ्या शेंडयावर ही अळी 300 ते 450 अंडी घातले. पिकावर रात्री येवून ही अळी पाने व शेंडे कुरतडते. पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव हाऊ शकतो. पूर्ण वाढ झालेली अळी ही जमीनीमध्ये कोषावस्थेत जाते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी बांधावर कचऱ्याचे ढीग तसेच तण राहणार नाही अशा पद्धतीने नियोजन करणे, प्रति हेक्टर 20 पक्षी थांबे उभारावे. मादी पतंग अंडी घालू नये याकरिता निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडीरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी दिला आहे. प्रादुर्भाव 2 अळ्या प्रति मिटर ओळ अशी आर्थिक नुकसानीची पातळी आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस 20 टक्के ईसी 50 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल 18.5 टक्के 3.0 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. ००००००