Saturday, 16 September 2017

विभागीय क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी 98 कोटींचा निधी - मुख्यमंत्री



·         इतर पायाभूत सोयी सुविधांसाठी 88 कोटी
·         पॅव्हेलीयनसाठी 10 कोटी
·         तत्काळ प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना
            नागपूर दि. 16 :- विदर्भातील खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे नाव कमाविण्याची योग्यता असून, ती त्यांनी वेळोवेळी सिध्द करुन दाखविली आहे. सिंथेटीक ट्रॅकवर जागतिक दर्जाचे खेळाडू घडावेत. दुस-या टप्प्यातील बांधकामामध्ये येणाऱ्या आवश्यक त्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  88 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच सिंथेटीक ट्रॅकच्या पॅव्हेलीयनसाठी 10 कोटी रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
             मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटीक ट्रँकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हस्तांतरण व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  
            यावेळी व्यासपीठावर महापौर श्रीमती नंदाताई जिचकारउपमहापौर दीपराज पार्डीकरआमदार सुधाकर देशमुखआमदार डॉ. मिलींद माने, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, विभागीय आयुक्त अनूप कुमार,महानगरपालिका आयुक्त अश्विन मुद्गलनागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकरक्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, आयोजन समितीचे अध्यक्ष  प्राचार्य बबनराव तायवाडे, प्रा. संजय भेंडे उपस्थित होते.
             क्रीडा संकुल परिसरातील सिंथेटीक ट्रॅकव्यतिरिक्त विविध सोयीसुविधाचे बांधकाम वेगाने सुरु आहे. याच वेगाने येथील कामे करा. त्यामुळे येथील खेळाडूंना त्याचा फायदा होईल, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॅकच्या पॅव्हेलीयनसाठी 10 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी क्रीडा विभाग आणि विभागीय आयुक्त अनूप कुमार यांना लगेच तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
          विदर्भातील पहिला तर राज्यातील तिसरा सिंथेटीक ट्रॅक असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसातील राज्यातील खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेतील कामगिरीचा आलेख हा चढताच राहीला आहे. क्रीडा हे महत्त्वाचे क्षेत्र बनले असून, या क्षेत्रात नवनव्या संधी निर्माण होत आहेत. यापूर्वी बालेवाडीसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल राज्य शासनाने बांधले आहे. त्यामुळे राज्य शासन क्रीडा विभागात यापुढे गुंतवणूक करण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी  सांगितले.  पश्चिम क्षेत्रीय कनिष्ठ गट अँथलेटीक्स अजिंक्यपद दोन दिवशीय स्पर्धेचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
            या स्पर्धेत सर्व खेळाडू खिलाडूवृत्तीने खेळतील. खेळात सर्वोत्तम खेळाडूचा विजयी होत असतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेतून नवी ऊर्जा, नवा आशावाद सोबत घेऊन जावा, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम भारतातील विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
             यापुढे सिंथेटीक ट्रँकवर सराव करून अनेक आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील. तसेच येथे सराव करून जागतिक पातळीवर राज्य तसेच देशाचा नावलौकिक कमावतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सुरुवातीला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्याकडे सिंथेटीक ट्रॅकच्या कागदपत्रांचे हस्तांतरण केले. त्यांनी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे म्हणजेच राज्य शासनाकडे कागदपत्रे हस्तांतरीत केली. 
  भारतीय अँथलेटीक्स महासंघ आणि महाराष्ट्र अँथलेटीक्स संघटनेच्या अधिपत्याखाली नागपूर जिल्हा अँथलेटीक्स संघटनामैत्री परिवार संस्थानागपूर महानगरपालिका आणि विभागीय क्रीडा संकुल समिती व उपसंचालकक्रीडा व युवक सेवा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने   ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच  आंतरराष्ट्रीय दर्जाचा 400 मीटर लांबीचा हा सिंथेटीक ट्रँक बांधण्यात आला आहे. ट्रँकचे बांधकाम आणि इतर सोयी –सुविधांसाठी आतापर्यंत 45 कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याचे क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे चेअरमन प्रा. संजय शेंडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
            कार्यक्रमाचे संचालन वृषाली देशपांडे  यांनी केले. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
                                                                        ****

No comments:

Post a Comment