भारतीय टपालखात्याच्या'पिन कोड'प्रणालीचे जनक आणि संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक #श्रीरामवेलणकर यांचा स्मृतिदिन. १५ऑगस्ट १९७२रोजी त्यांच्या पुढाकाराने पिन कोड पद्धत अंमलात आली.टपाल कामगारांच्या कार्याचे मूल्यमापन करण्याची'वेलणकर कोष्टके' त्यांनी तयार केली.
Tuesday, 31 March 2026
१ एप्रिल #दिनविशेष
प्रसिद्ध कवयित्री आणि गीतकार #संजीवनीमराठे यांचा स्मृतिदिन.शालेय जीवनापासूनच त्यांच्या काव्यलेखन व काव्य गायनास सुरुवात झाली.उत्तमोत्तम कविता लिहून त्यांनी मराठी कवितेच्या प्रांतात ठसा उमटवला.काव्य संजीवनी,राका,चित्रा,
छाया हे त्यांचे काव्यसंग्रह गाजले.
Monday, 30 March 2026
Friday, 27 March 2026
सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 31 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड
सावनेरच्या मुख्य रस्त्याचे सौंदर्यीकरण व मौनीबाबा आश्रमाचे भूमिपूजन आज झाले. खत आणि कोल गॅसिफिकेशन असे दोन मोठे प्रकल्प या भागात उभे राहणार आहेत यातून 40 हजारावर रोजगार निर्मिती होणार आहे. या सर्व प्रकल्पांमधून सुजलाम- सुफलाम सावनेर होण्याच्या दिशेने सुरुवात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
जगात युद्धाची परिस्थिती असताना भारत विश्वशांतीच्या दिशेने विचार करतो आणि विश्वशांतीसाठी विश्व महाआरतीचे सावनेर मध्ये झालेले आयोजन भूषणावह असल्याच्या भावना व्यक्त करून महाआरतीच्या गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
श्री रामनवमीच्या पवित्र पर्वावर सावनेर नगरपरिषद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती विश्व विक्रमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजनही त्यांचा हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड आशिष जयस्वाल,आमदार डॉ. आशिष देशमुख ,माजी मंत्री रणजित देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रभु राम हे आपले आदर्श आहेत. समाजात कोणी लहान मोठे नसून सर्व समान असल्याची शिकवण देऊन त्यांनी युगधर्म मांडला. त्याच प्रभु रामांच्या जन्मदिनी रामनवमीला सावनेरचा मुख्य रस्ता सौंदर्यीकरण प्रकल्प आणि रघवी समाजाचे थोर संत मौनीबाबा यांच्या आश्रमाचे बांधकाम व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन झाले. सावनेर मतदार संघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी या भागात कोल गॅसीफिकेशन प्रकल्प आणि खत प्रकल्पसाठी केंद्र व राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केला. येत्या काळात हे दोन मोठे प्रकल्प या भागात उभे राहणार असून याद्वारे जवळपास 40 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या सर्व कामांद्वारे या भागाच्या विकासाला चालना मिळेल व हा भाग सुजलाम- सुफलाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय रस्ते निधीच्या 26 कोटी रुपयातून सावनेर मुख्य रस्ता सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे तर 5 कोटी खर्चातून मौनीबाबा आश्रम उभारणी व सौंदर्यीकरण होणार आहे.
तत्पूर्वी ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री तथा पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्यासह 4911 भक्तांनी गणपतीची महाआरती केली. याच कार्यक्रमात गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या भारतातील अधिकाऱ्याने या महाआरतीचा हा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आमदार डॉ आशिष देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
००००००
पश्चिम नागपूर, पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रांना उपस्थिती
प्रभू श्रीराम हे जीवनाचा आदर्श-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समाजात सर्व प्रकारचे आदर्श प्रस्थापित करण्याचे कार्य प्रभू श्रीरामचंद्र यांनी केले. त्यामुळेच श्रीराम हे आपल्या सर्वांच्या जीवनाचा आदर्श असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी केले.
पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे श्रीराम नवमी निमित्त काढण्यात येणाऱ्या शोभयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
रामनगर येथील श्रीराम मंदिर परिसरात हा कार्यक्रम झाला. समाजात समता असली पाहिजे हे प्रभू श्रीरामांनी आपल्या जीवनातून दाखवून त्याच प्रकारे कार्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगतानाच उपस्थिताना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. विकास ठाकरे, खा. मायायताई इवानते यावेळी अतिथी म्हणून उपस्थित होते.
सायंकाळी मंदिरात आगमन होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर अतिथींच्या हस्ते पालखी पूजन व आरती करण्यात येऊन शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे, सरचिटणीस राजीव काळेले, मनपा स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, योगेश पाचपोर, अनिरुद्ध पालकर, प्रवीण महाजन प्रभृती उपस्थित होते.
पोद्दारेश्वर राम मंदिर नागपूर नगरीचे ठळक वैशिष्ट्य असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे काढण्यात येणाऱ्या शोभयात्रेतही मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले होते. या शोभायात्रेचे यंदा साठावे वर्ष आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. मायाताई इवानते, आ. प्रवीण दटके, महापौर नीता ठाकरे, माजी मंत्री रमेश बंग, माजी महापौर दयाशंकर तिवारी, प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते प्रारंभी राम, लक्ष्मण, सीता माई यांच्या मूर्तीची पूजा करून श्रीरामाची आरती करण्यात आली. त्यानंतर जय श्रीरामच्या जयघोषात अतिथिनी रथ ओढून शोभायात्रेचा शुभारंभ केला.
०००००
Thursday, 26 March 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ऐतिहासिक पोद्दारेश्वर राममंदिर येथील राम जन्मोत्सव शोभा यात्रेत सहभागी झाले.
यावेळी त्यांनी श्रीरामाची आरती व पूजा केली. यानंतर रथ ओढून रथ यात्रेची विधीवत सुरुवात झाली.
केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार माया इवनाते, आमदार कृपाल तुमाने आणि प्रवीण दटके, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आदी उपस्थित होते
Tuesday, 24 March 2026
Monday, 23 March 2026
नागपूर : श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन तर्फे येथील सोमलवाडा परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधायुक्त गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटरचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार २२ मार्च २०२६ रोजी झाले.
लोकार्पण सोहळ्यास श्रीमती सरिता गंगाधर फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर अर्थ व नियोजन मंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, खासदार मायाताई इनवाते, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्रफित_मा.उपराष्ट्रपती_भारतीय युवा संसद
नागपूर : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शनिवार ,२१ मार्च २०२६ रोजी रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात 29 व्या भारतीय युवा संसद परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, भारतीय युवा संसद परिषदेचे राष्ट्रीय संयोजक आशुतोष जोशी यावेळी उपस्थित होते.
Monday, 16 March 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्थसंकल्पावरील विभागीय माहिती संचालक कार्यालयाच्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्थसंकल्पावरील
विभागीय माहिती संचालक कार्यालयाच्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन
माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर
विभागीय माहिती संचालक कार्यालयाने महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी
सादर अर्थसंकल्पामध्ये विदर्भासाठी करण्यात आलेल्या तरतुदींवर आधारित घडी पुस्तिकेचे
प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मुख्यमंत्री यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी आयोजित अनौपचारिक कार्यक्रमात
हे प्रकाशन पार पडले. नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, सहायक संचालक
पल्लवी धारव, माहिती अधिकारी रितेश भुयार, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रसिद्धी समन्वयक
अविनाश महालक्ष्मे, रमाकांत दाणी, अनिल गडेकर यावेळी उपस्थित होते.
अर्थ संकल्पात विदर्भातील कृषी, आरोग्य, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा
आदींबाबत करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती वैविध्यपूर्ण ग्राफिक्सद्वारे घडी पुस्तिकेत
देण्यात आली आहेत. उत्तम रंगसंगती आणि मांडणीमुळे घडी पुस्तिका आकर्षक झाली आहे. विविध
शासकीय कार्यालये आणि प्रसार माध्यमांसाठी ही घडी पुस्तिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरणार
आहे.
0000
Tuesday, 10 March 2026
नागपूरकरांना राज्यभरातील विशेष व्यंजन व जिन्नसांची मेजवानी राज्यस्तरीय महालक्ष्मी महासरस प्रदर्शनात तळमळी फुलांचे हार, अष्टर मशरूम लोणचे व शेंगदाणा चटणी व भाकरीचे आकर्षण
बीड येथील महिला स्वयं सहायता गटाचा वर्षभर टिकणारा तळमळी फुलांचा हार, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर बचतगटानी स्वतः अष्टर मशरूम पिकवून तयार केलेले मशरूम लोणचे,सोलापूर येथील शेंगदाणा चटणी व कोरड्या बाजरी- ज्वारीच्या भाकरी, बुलढाण्याची अंबाडीची व वाशिमची हरभऱ्याची सुकवलेली भाजी आणि नाशिक येथील निर्यातक्षम फ्लेम द्राक्ष व मनुका असे अनेक स्टॉल येथील रेशीमबाग मैदानावर आज पासून सुरू होत असलेल्या महालक्ष्मी महासरस प्रदर्शनात सजली आहेत. या माध्यमातून नागपूरकरांना राज्याच्या वेगवेगळ्या भागातील वैविध्यपूर्ण व्यंजन व वस्तुंची मेजवानी मिळणार आहे.
राज्य शासनाचा ग्रामविकास विकास व पंचायतराज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राज्य स्तरीय महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शना’चे रेशीमबाग मैदानावर 11 ते 23 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात महिलांनी हस्त कले पासून उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची विक्री होणार असून महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद नागपूरकरांना घ्यायला मिळणार आहे. या प्रदर्शनात एकूण 370 स्टॉल उभारण्यात आले असून 100 खाद्यपदार्थांचे व गृहोपयोगी वस्तुंच्या 270 स्टॉल्सचा समावेश आहे.
हॉल क्रमांक ‘डी’ मध्ये बीड येथील दुर्गा माता स्वयंम सहाय्यता गटाच्या संचिता म्हस्के यांचा स्टॉल खास आकर्षण ठरणार आहे तो त्यांच्या आकर्षक तळमळी फुलांच्या हारांमुळे. कुठल्याही प्रकारचे प्लॅस्टिक किंवा अनैसर्गीक प्रकारचे साहित्य न वापरता थेट फुलांचे हार विकत घेण्याची संधी ग्राहकांना या स्टॉलवर मिळणार आहे. तळमळी हे अस्टर सदृष्य फुल असून यापासून तयार केलेले व किमान वर्षभर टिकाणारे हार येथे विक्रीसाठी आहेत.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील भक्ती स्वयं सहायता गटाच्या महिलांनी अस्टर मशरुमची शेती करून त्यापासून उत्पादन निर्मिती केली आहे. सुकवलेले अष्टर मशरूम आणि याच मशरूमचे लोणच्याचे उत्पादन घेऊन आलेल्या उषा बेलसरे आणि योजना डेंगे यांना सरस प्रदर्शनात या आगळया उत्पादनाची जोरदार विक्री होण्याचा विश्वास आहे.
वाशिम येथील लक्ष्मी स्वयं सहायता गटाच्या अर्चना गावंडे यांच्या स्टॉलवर पेंडखजूर बर्फी, खारोडया,वडया, पिठाच्या कुरळया आणि खास म्हणजे सुकवलेली हरभऱ्याची भाजीही आकर्षण ठरणार आहे. बुलडाणा येथील जय भवानी गटाने अंबाडीची सुकलेली भाजी प्रदर्शनात ठेवल्याने ग्राहकांना या खास भाज्यांची विक्री करता येणार आहे. युरोप, रशिया आणि दुबईमध्ये निर्यात करण्यात येणारे केमीकल फ्री फ्लेम द्राक्ष आणि याच द्राक्षांचे मनुके नाशिक येथील सोहम गटाच्या स्टॉलवर दिसून येतात. मामा जंबो जातीचा काळा व सोनाका जातीचा नॅचरल मनुकाही येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सोलापूर येथील राधाकृष्ण गटाच्या स्टॉलवर राणी आणि साक्षी बेलसरे या माय-लेकी शेंगदाणा चटणी व बाजरी-ज्वारीच्या कडक भाकरीची मांडणी करतांना दिसल्या. या भाकरी जवळपास तीन महिने शाबुत राहतात व शेंगदाणा चटणीही बराच काळ टिकते त्यामुळे बरेच ग्राहक या स्टॉलकडे वळतील यात शंका नाही. जळगाव येथील ममता गटावर मिलेट धान्यापासून बनलेल्या रोस्टेड बाजरी व सोयाबीन आणि बुलढाण्याच्या प्रगती गटाचा केमीकल फ्री मसूर,तूर,हरभरा,उडीद डाळींचा स्टॉलही सर्वांचे आकर्षण ठरणार आहे.
राज्याच्या 34 जिल्ह्यातील महिला स्वयं सहायता समूहांची आज नोंदणी पूर्ण झाली आहे. हातमाग व कलाकसुरीच्या वस्तू, मातीची भांडे, कोल्हापुरी चप्पल, भिवापूरी मिरची, तृणधान्य, कळधान्य आदी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. राज्यातून येणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योगांना आर्थिक बळ मिळावे तथा महिलांना मोठी बाजारपेठ मिळावी म्हणून महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.
राज्यातील स्वयं सहाय्यता समुहांतील महिलांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणे हा महालक्ष्मी सरस प्रदर्शनीचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून शहरी भागातील लोकांना अस्सल देशी-गावराण वस्तू/पदार्थ प्रदर्शनाद्वारे उपलव्ध करुन देण्यात येत आहेत. नागपूर महाल्क्षमी सरस प्रदर्शनीद्वारे विदर्भातील स्वयं सहाय्यता गटांना बाजापेठ उपलब्ध होण्यासाठी व त्यांच्या उत्पादकतेला तसेच व्यावसायिकतेला चालना मिळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. महालक्षमी सरस हा आता विश्वासार्हतेचा ब्रान्ड झाला आहे. या प्रदर्शनातून गुणवत्ता, दर्जा आणि शुद्धता त्याचबरोबर वाजवी दर यासाठी उमेद अभियानाकडून बारकाईने कार्यवाही केली जाते.
००००००






.jpeg)


.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)







.jpeg)

.jpeg)

.jpeg)


.jpeg)









