Wednesday, 15 April 2026


 #नारीशक्तीवंदनअधिनियम 


यावर्षी (वर्ष २०२६) सुरु झालेल्या राष्ट्रीय जनगणनेतील आकडयांचा आधार मानून हे आरक्षण प्रत्यक्षात येणार आहे. त्या नुसारच मतदार संघांचे परिसीमन आणि जागांची चक्राकार पद्धतीने निश्चिती होणार आहे.


#NariShaktiVandhan 

#NariShakti 

#EmpoweringWomen

Tuesday, 14 April 2026


 #नारीशक्तीवंदन अधिनियमानुसार अनुच्छेद ३३० (ए) मध्ये संशोधन करून केंद्रीय कायदेमंडळ तर अनुच्छेद ३३२ (ए) मध्ये संशोधन करून राज्यांच्या कायदेमंडळात आणि अनुच्छेद २३९ ए ए (२) (बी) नुसार राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली मध्ये महिला आरक्षणाची तरतूद करण्यात आली. 


#NariShaktiVandhan


 #नारीशक्तीवंदन अधिनियमाचे वैशिष्टय हे की,

संसदेने पारीत केलेल्या या अधिनीयमानुसार #लोकसभा,#राज्यसभा आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र #दिल्ली विधानसभेत शक्य तेंव्हा एक तृतियांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात यावे असे नमुद आहे. 


#NariShaktiVandhan 

#NariShakti 

#EmpoweringWomen

Monday, 13 April 2026

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू* : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार




 राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे  उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे.


       गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नावीन्य पूर्ण रुग्णस्नेही बदल करण्याचे काम सुरु आहे. त्याचाच एक भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली असणार आहे.  रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. त्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळणार आहे.  तसेच, गेल्या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. 


मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख  रामेश्वर नाईक म्हणाले की, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यामुळे आता अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचे अधिकृत उद्घाटन लवकरच होणार असून, त्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गरजू रूग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

             ****

#राज्यमंत्रिमंडळ निर्णय.





 


 विशेष करून #नारीशक्तीवंदन विधेयकामुळे आधीपासून अनुसूचित जाती व जमातीतील महिलांसाठी राखीव असलेल्या जागा आता या आरक्षणाअंतर्गत येणार आहेत.


#NariShaktiVandhan 

#NariShakti 

#EmpoweringWomen


 #लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के प्रतिनिधीत्व मिळवून देणारे #नारीशक्तीवंदन हे विधेय संसदेच्या नवीन इमारतीत पारीत झालेले पहिले विधेयक ठरले हे ही वेशिष्टयपूर्ण आहे.


#NariShaktiVandhan 

#NariShakti 

#EmpoweringWomen

Sunday, 12 April 2026

‘नारी शक्ती वंदन अधिनियम -२०२३’


 संसदेत राज्यघटनेच्या १२८व्या संशोधनाद्वारे  पारीत विधेयकाचे अनुच्छेद १११ नुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीने २८ सप्टेंबर २०२३ रोजी  ‘नारी शक्ती वंदन अधिनियम -२०२३’ चे ऐतिहासिक व महत्वपूर्ण कायद्यात रुपांतर झाले.

#NariShaktiVandhan 

#NariShakti 

#EmpoweringWomen

१६ ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन


 येत्या काळात संसद आणि राज्यांच्या विधिमंडळात महिलांना ३३ टक्के प्रतिनिधीत्व मिळण्याच्यादृष्टीने चर्चा व सर्वानुमते त्यावर शिक्कामोर्तब होण्याकरिता १६ ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे.


#NariShaktiVandhan 

#NariShakti 

#EmpoweringWomen

‘नारी शक्ती अधिनीयम’

 




देशातील महिलांच्या  प्रगतीला अधिक चालना देण्यासाठी व २०४७ मध्ये विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महिलांचे योगदान व सहभाग वाढविण्याकरिता केंद्रशासनाने संसदेत ‘नारी शक्ती अधिनीयम’ पारित केला.


#NariShaktiVandhan

#NariShakti

#EmpoweringWomen

Saturday, 11 April 2026


 नारी शक्ती अधिनियमामुळे सर्वसमावेशक प्रतिनिधित्वाला चालना 


#NariShaktivanda


 नारी शक्ती अधिनियमामुळे सर्वसमावेशक प्रतिनिधित्वाला चालना 


#NariShaktivanda


 Safety, Rights and Leadership of Women's 


#NariShaktivandan

 नारी शक्ती अधिनियमाची आवश्यकता का होती?


#NariShaktiVandan

Thursday, 9 April 2026


 १० एप्रिल #दिनविशेष


आज #राष्ट्रीयभूमापनदिन.


१० एप्रिल १८०२ रोजी भारतातील जमिनीची अधिकृत त्रिकोणमितीय मोजणी (ट्रायगोनोमेट्रिक सर्व्हे) सुरू झाली होती या औचित्याने हा  राष्ट्रीय भू मापन दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशातील जमिनीच्या अचूक मोजमापाचे महत्त्व अधोरेखित करतो.


 १० एप्रिल #दिनविशेष 


आज #जागतिकहोमिओपॅथीदिवस.

 होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांचा जन्मदिन दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांनी “Like cures like” या तत्त्वावर आधारित होमिओपॅथी प्रणालीची स्थापना केली


 १० एप्रिल #दिनविशेष


नाटककार,चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार मोतीराम गजानन तथा #मोगरांगणेकर यांचा जन्मदिन.आशीर्वाद,कुलवधू,नंदनवन,अलंकार, माझे घर,वहिनी,एक होता म्हातारा,कोणे एके काळी ही नाटके त्यांनी लिहिली व दिग्दर्शित केली.'भटाला दिली ओसरी' हे त्यांचे विनोदी नाटक आणि 'सीमोल्लंघन' कादंबरी प्रसिद्ध आहे.


 १० एप्रिल #दिनविशेष


नाटककार,चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार मोतीराम गजानन तथा #मोगरांगणेकर यांचा जन्मदिन.आशीर्वाद,कुलवधू,नंदनवन,अलंकार, माझे घर,वहिनी,एक होता म्हातारा,कोणे एके काळी ही नाटके त्यांनी लिहिली व दिग्दर्शित केली.'भटाला दिली ओसरी' हे त्यांचे विनोदी नाटक आणि 'सीमोल्लंघन' कादंबरी प्रसिद्ध आहे


 आर्थिक सेवांच्या उपलब्धेपासून ते महिलांचा उद्योजकतेच्या दिशेने प्रवास


* प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 68% कर्ज महिलांना देण्यात आले 


* 1.48 कोटी लखपती दिदी बनल्या आहेत. 



#NariShakti #NariShaktiVandan


 शिक्षण आणि आर्थिक सुरक्षेच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण


 

#NariShakti #NariShaktiVandan


 महिला करत आहेत, भारताच्या परिवर्तनाचे नेतृत्व




#NariShaktiVandan

#NariShaktiVandanAdhiniyam


 #महिलाआरक्षण विधेयकाबाबत कल्याण-डोंबिवलीच्या महापौर हर्षाली विजय थविल यांची प्रतिक्रिया.



#NariShaktiVandan


  विधायी सभांमध्ये महिलांसाठी आरक्षणाची आता आवश्यकता आहे ! यामुळे आपली लोकशाही आणखीही सहभागी होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी


#NariShaktiVandan 

#NariShaktiVandanAdhiniyam

महिलांना ३३ टक्के प्रतिनिधित्व देण्यासाठी महिला आरक्षण विधेयक अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार १६ ते १८ एप्रिल दरम्यान तीन दिवसीय विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव मांडत आहे. 



#NariShaktiVandan

Wednesday, 8 April 2026


 ९ एप्रिल #दिनविशेष 


महाराष्ट्रातील लोककला संशोधक,गीतकार, नाटककार #अशोकपरांजपे यांचा स्मृतीदिन.त्यांनी फ्रान्स,आयलंड,जपान आदी देशांत महाराष्ट्रातील लोककलांची पथके नेवून तेथे मार्गदर्शन केले.लोककलावंतांना नागर रंगमंच उपलब्ध करून दिला. लोककला प्रकारांवर पुस्तिका प्रसिध्द केल्या.


 भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा


✒️विषय : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य...

🗓️स्पर्धेचा कालावधी : दि. १४ ते २० एप्रिल २०२६


अधिक माहितीसाठी सोबत दिलेला QR कोड स्कॅन करावा


 ९ एप्रिल #दिनविशेष


समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी तथा #सार्वजनिककाका यांचा जन्मदिन.सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली.महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीत त्यांनी #दुष्काळनिधी उभारला.

 

९ एप्रिल #दिनविशेष


प्रख्यात कादंबरीकार व इतिहासकार #शंकररावखरात यांचा स्मृतिदिन.माणुसकीची हाक,बारा बलुतेदार,तडीपार,सांगावा,टिटवीचा फेरा, दौंडी,गावशिव या कथासंग्रहांतून त्यांनी  माणसांचे अनेक स्तरांवरील जीवन मांडले. त्यांचे वैचारिक लेखन आणि कांदबरीलेखनही प्रसिद्ध आहे.


 देशात महिला व मुलींसाठीच्या विविध योजना त्यांना पुढे नेत आहेत. मुली आता फक्त घरची लक्ष्मी नाही तर देशाची शक्ती असल्याचे अधोरेखित होत आहे.



#NariShaktiVandan

#NariShaktiVandanAdhiniyam


  विशेष लेख



नारी शक्ती वंदन : महाराष्ट्र अग्रेसर


          'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी', या एका कवितेच्या ओळी साऱ्यांनाच अवगत असल्या, तरी आपल्या देशात महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग हा तसा मर्यादितच राहिला आहे. केवळ साहित्य किंवा इतिहासातील चार- दोन दाखले देऊन हा विषय संपत होता. त्यामुळेच भारतात महिलांचे सशक्तीकरण हा केवळ चर्चेचा विषय होता. शहरी भागात शिक्षणाच्या सुविधांमुळे थोडी बरी स्थिती असली, तरी ग्रामीण भागात मात्र विदारक परिस्थिती होती. मात्र २०१४ नंतर देशात हे चित्र बदलायला सुरुवात झाली. देश सशक्त व्हायचा असेल, तर स्त्री सशक्त झाली पाहिजे हे स्वप्न पाहून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य दिले आणि त्यासाठी विविध योजना आणून त्याची अंमलबजावणीही सुरू केली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या योजना राबवितानाच राज्याच्याही योजना सुरू करून महिला सक्षमीकरणाला बळ दिले. त्यामुळे पाळण्याची दोरी धरणारे हात आता देशाच्या अर्थकारणात आपले भरीव योगदान देऊ लागले आहेत.

        महिला सशक्तीकरण म्हणजे नेमके काय, तर त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे त्याचप्रमाणे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षम होऊन समाजाच्या विकासात महिलांनी सक्रिय भूमिका बजावू शकणे. त्यासाठी महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देणे गरेजेचे असते. ग्रामीण भागातील महिला विविध अडचणींचा सामना सतत करीत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथील शिक्षणाचा अभाव. मुलगा आणि मुलींच्या शिक्षणाच्याबाबतीत पालकांकडूनच (जागृती नसल्याने) होणारा पक्षपात ही शैक्षणिक अभावाची कारणे. ‘मुलीला शिकून काय करायचं आहे?’  या मानसिकतेचसहच छोट्या- छोट्या गावांमध्ये नसलेली शैक्षणिक सुविधा हेही ग्रामीण मुली शिक्षणापासून दूर राहण्याचे महत्त्वाचे कारण होते. मुलींचे लवकर लग्न, आर्थिक अवलंबित्व, आरोग्य सुविधांची कमतरता, सामाजिक बंधने व परंपरा यांच्या दुष्टचक्रात ग्रामीण स्त्री अडकली होती. तिला त्यातून बाहेर काढणे गरजेचे होते. त्या पार्श्वभूमीवर महिला सशक्तीकरण अभियान अतिशय फायद्याचे ठरत आहे आणि त्याचे फार चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

         महिला सशक्तीकरणामुळे मुलींच्या पारंपरिक शिक्षणाला प्रोत्साहनासहच त्यांना देण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू लागला आणि विविध ठिकाणी तिला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळे हीच ग्रामीण स्त्री आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ लागली आहे. 

        ग्रामीण भागात बहुतांश महिला शेतीशी जुळलेल्या असतात. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय, हस्तकला, दुग्धव्यवसाय याद्वारे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण वेगाने होऊ लागले. विविध गावांमध्ये स्थापन  झालेल्या बचत गटांमुळे महिला एकत्र येऊन करीत असलेली वाटचाल क्रांती घडविणारी आहे. महिला सशक्तीकरणाच्या योजनेत छोट्या उद्योगांसाठी सरकारने त्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आर्थिक स्वावलंबनामुळे महिलांची समाजातील प्रतिष्ठा वाढते, याची प्रचीती आज ग्रामीण भागात विशेषत्वाने येत आहे.

     ग्रामीण महिलांचे आरोग्य हाही तसा उपेक्षित विषय. त्यामुळे जगाचा उद्धार करण्याची क्षमता असलेली ग्रामीण स्त्री विविध आजारांचे ओझे घेऊनच जगत राहायची. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या स्त्रीसाठी साध्या आरोग्य सुविधाही गावात नव्हत्या. त्यामुळे माता व बाल मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण ग्रामीण भागातच पाहायला मिळत होते. राज्य शासनाने या महिलांसाठी पोषण आहार योजना आणलीच पण छोट्या- छोट्या गावांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊन कोवळी पानगळ थांबविली आहे. अलीकडेच अहेरी येथे खास महिलांसाठीच्या अत्याधुनिक रुग्णालयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. प्रकृती बिघडल्यावर मांत्रिकांकडे जाणाऱ्या या परिसरातील आदिवासी महिला आता या रुग्णालयाचा लाभ घेत आहेत. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील या महिला रुग्णालयामुळे परिसरातील महिलांची मोठी सोय झाली आहे.

         महिलांमध्ये कायदेशीर व सामाजिक जागरुकता येण्यासाठी वारसा, संपत्ती, शिक्षण याबाबत महिलांचे हक्क काय आहेत, कौटुंबिक हिंसाचाराविरोधात ती कशी उभी राहू शकते, यावर महिला सशक्तीकरण अभियानाचा भर असल्याने ग्रामीण भागातील बदलत असलेली परिस्थिती या अभियानाचे यश अधोरेखित करणारी आहे.

       बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला ई- हाट, उज्वला योजना या केंद्र सरकारच्या…

 च्या मंजूर कर्जांपैकी दोन-तृतीयांशहून अधिक कर्जे महिलांना देण्यात आले.

देशभरातील महिला-नेतृत्वाखालील उद्योग अधिक सक्षम झाले आहेत.


#NariShaktiVandan


 #वन_स्टॉप_सेंटर (ओएससी)

महिलांसाठी  मदत उपलब्ध:

■वैद्यकीय मदत

■ पोलीस सहाय्य

■कायदेशीर मदत

■तात्पुरता निवारा

■ मानसिक-सामाजिक समुपदेशन


#NariShaktiVandan


 वर्ष २०२५–२६ मध्ये देशांतर्गत दत्तक ग्रहण प्रक्रियेत ५४% मुली दत्तक घेण्यात आल्या.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या मोहिमा व बालकल्याणाबाबत केंद्र व राज्य सरकारच्या संवेदनशील धोरणांमुळे हा बदल घडला. मुलींबद्दल समाजात विश्वास व स्नेह वाढत आहे.  


#NariShaktiVandan


 पूर्वी #महिला काहीच व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कार्य करताना दिसत होत्या.मात्र, आता भारतातील महिलांनी संरक्षण, विज्ञान, उद्योजकता, शासन आणि नवकल्पना यासारख्या क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे.  


 #NariShaktiVandan

#NariShaktiVandanAdhiniyam


 महिला आरक्षण विधेयकावर अभिनेता आणि दिग्दर्शक सुनील शेट्टी यांची प्रतिक्रिया.



#NariShaktiVandan #NariShaktiInParliament


 देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणास नवी ऊर्जा मिळाली आहे. नारी शक्ती वंदन विधेयकावर खासदार रवी किशन यांची प्रतिक्रिया 


 #NariShaktiVandan


 ८ एप्रिल #दिनविशेष


प्रसिद्ध मराठी कादंबरीकार #रणजीतदेसाई यांचा आज जन्मदिन.त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत.छत्रपती #शिवाजीमहाराज यांच्यावरील #श्रीमानयोगी, माधवराव पेशव्यांवरील #स्वामी व कर्ण या व्यक्तिरेखेवरील #राधेय या त्यांच्या प्रसिद्ध कलाकृती आहेत.


 ८ एप्रिल #दिनविशेष 


मराठी रंगभूमीचे नटसम्राट #नानासाहेबफाटक यांचा स्मृतिदिन.‘रक्षाबंधन’नाटकातील ‘गिरीधर’च्या भूमिकेने त्यांना लोकप्रियता मिळाली. नाट्यवाङ्मयावर भाष्य करणारा विचारवंत म्हणूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध असून ‘मुखवट्याचे जग’ हे पुस्तक त्याची साक्ष आहे.


 ८ एप्रिल  #दिनविशेष


सर्जनशील थोर संगीतकार व समर्थ गायक शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली उर्फ #कुमारगंधर्व यांचा जन्मदिन.हिंदुस्थानी संगीत पद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची वेगळी गायकी निवडली. ते ७ वर्षांचे असताना गुरुकल्ल मठाचे शांतिवीरस्वामी यांनी त्यांना त्यांच्या विलक्षण गायकीबद्दल कुमार गंधर्व ही पदवी दिली. 

आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले.

Monday, 6 April 2026


 जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन (‘रीवाइल्डिंग’) प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने झिरोधा कंपनी व संवर्धन भागीदार फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहन आणि पाठबळामुळे हा प्रकल्प साकारणार असून दीर्घकालीन पर्यावरण पुनरुज्जीवन आणि हवामान लवचिकतेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.


हा उपक्रम संरक्षित अरण्ये, सामुदायिक जमीन, शेती क्षेत्र, गवताळ प्रदेश आणि जलस्रोत अशा विविध भूप्रकारांचा एकत्रित विचार करणारा राज्यातील पहिलाच सर्वसमावेशक लँडस्केप पुनर्संचय प्रकल्प ठरणार आहे. प्रत्येक भूप्रकारानुसार शास्त्रीय पद्धतीने आखलेल्या उपाययोजना राबवून परिसंस्थेचे पुनरुज्जीवन, जैवविविधतेत वाढ आणि मानव वन्यजीव सहअस्तित्व मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.


जैवविविधतेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू


चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प मानला जातो. सुमारे १,७२७ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पात दक्षिण उष्णकटिबंधीय कोरड्या पानझडी जंगलांचे मुख्य आणि बफर क्षेत्र समाविष्ट आहे. येथे वाघांची संख्या लक्षणीय असून राखीव क्षेत्रात ८० हून अधिक वाघ असल्याचा अंदाज आहे. गेल्या दशकात या परिसरात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.


वाघांव्यतिरिक्त बिबटे, रानकुत्रे (ढोले), अस्वल, गवा, विविध हरिण प्रजाती, साप (यामध्ये संकटग्रस्त भारतीय अजगर) आणि १९५ हून अधिक पक्षीप्रजाती येथे आढळतात. त्यामुळे मध्य भारतातील जैवविविधतेसाठी हा परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.


मात्र, वाघसंख्येतील वाढ आणि बफर क्षेत्रातील मानवी वस्ती यामुळे मानव वन्यजीव संघर्षाची समस्या वाढत आहे. तसेच विकासामुळे अधिवास तुकड्यात विभागले जाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे एकात्मिक आणि समुदायाभिमुख पुनर्संचय उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे.


रीवाइल्डिंग प्रकल्पाची वैशिष्ट्ये

या सामंजस्य करारानुसार पुढील उद्दिष्टे साध्य होणार आहेत  :

* राखीव क्षेत्राभोवती ८०० एकरांहून अधिक अधोगती झालेल्या जमिनीचे पुनर्संचय

* पुनर्संचय उपक्रम, सामुदायिक रोपवाटिका आणि पर्यावरणीय देखरेखीद्वारे १५,००० पेक्षा अधिक ग्रामीण रोजगार दिवसांची निर्मिती

* १०० हून अधिक स्थानिक वृक्ष, झुडुपे व गवत प्रजातींची लागवड आणि संवर्धन,

ज्यामुळे भक्ष्य प्रजाती व इतर वन्यजीवांना अधिवास उपलब्ध होईल

प्रकल्पाची रचना केवळ पारंपरिक वृक्षलागवडीपुरती मर्यादित नसून परिसंस्थेतील नैसर्गिक प्रक्रिया पुनर्संचयित करणे, अधिवासांची जटिलता वाढविणे आणि विविध भूप्रकारांमध्ये वन्यजीवांना मुक्तपणे वावरण्यास सक्षम करणे, या व्यापक उद्दिष्टांवर आधारित आहे.


हा उपक्रम वन्यजीव, स्थानिक समुदाय आणि हवामान या तिन्ही घटकांना लाभदायी ठरेल. विविध भूप्रकारांमध्ये समन्वित काम केल्यास अधिवास ऱ्हासाची कारणे दूर करता येतील आणि भविष्यासाठी लवचिकता निर्माण करता येईल, असे वन विभागाने म्हटले आहे.

व्यापक प्रादेशिक संवर्धन प्रयत्नांचा भाग


हा प्रकल्प पूर्व महाराष्ट्रातील सुरू असलेल्या संवर्धन उपक्रमांना पूरक ठरणार आहे. २०२१ पासून ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट’ संस्था सुमारे २ लाख हेक्टर वनक्षेत्र, शेती क्षेत्र आणि सामुदायिक जमिनीवर कार्यरत आहे. जंगल संरक्षण, पुनर्वनीकरण, समुदाय सहभाग, रस्त्यावर नाट्यप्रयोगांद्वारे जनजागृती, अग्नि व्यवस्थापन, ऊर्जा कार्यक्षम चुलींचे वितरण आणि अधिवास सुधारणा अशा विविध माध्यमांतून मानवी–वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नवीन भागीदारीमुळे संस्थात्मक क्षमता आणि तांत्रिक साधनसंपत्ती वाढणार असून ताडोबा परिसरातील पर्यावरण पुनर्संचय प्रयत्नांना नवे बळ मिळणार आहे.


झिरोधाची दीर्घकालीन पर्यावरण बांधिलकी

झिरोधा ही कंपनी आपल्या एकूण उत्पन्नाच्या १० टक्के रक्कम सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांसाठी देत आहे. २०२० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या रेन मॅटर फाऊंडेशन मार्फत हवामान कृती, परिसंस्था पुनर्संचय, शाश्वत उपजीविका आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याला याद्वारे चालना देण्यात येत आहे.


२०२५ मध्ये १५ व्या वर्धापनदिनानिमित्त झिरोधाने ‘झिरोधा रिवाईंड फंड’ची घोषणा केली असून, देशभरातील अधोगती झालेल्या भूभागाच्या पुनर्संचयासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी झिरोधामार्फत, रेनमॅटर फाउंडेशनच्या सहकार्याने राबविला जाणार असून मोठ्या प्रमाणावर रीवाइल्डिंग उपक्रमांना चालना देण्याचा उद्देश आहे. या फंडच्या माध्यमातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

७ एप्रिल #दिनविशेष


 ७ एप्रिल #दिनविशेष


आज #जागतिकआरोग्यदिन.

१९५० मध्ये प्रथमच जागतिक आरोग्य संघटनेने  ७ एप्रिल हा आपला वर्धापन दिन जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.जागतिक स्तरावर महत्त्वाच्या आरोग्य समस्या व आरोग्य हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

७ एप्रिल #दिनविशेष


 


भारताचे #एडिसन म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ डॉ #शंकरआबाजीभिसे यांचा स्मृतिदिन. त्यांनी २०० पेक्षा अधिक शोध  लावले. त्यांच्या नावावर ४०हून अधिक शोधांचे एकस्व आहेत.जागतिक दर्जाच्या ‘हु इज हु’ या संदर्भग्रंथात ‘भारताचे एडिसन’ असा त्यांचा गौरव केला आहे.

७ एप्रिल #दिनविशेष




'गर्जा महाराष्ट्र माझा' हे #महाराष्ट्र गाैरव गीत लिहिणारे प्रतिभावान कवी #राजाबढे यांचा स्मृतिदिन.चित्रपट निर्माते,नाटककार,अभिनेते म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमटवली.'चांदणे शिंपीत जाशी','आज कळीदार कपुरी पान'आदी दर्जेदार काव्यरचना त्यांनी केल्या.

Sunday, 5 April 2026


 श्रीमती #मायाइवनाते यांनी आज राज्यसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी.पी.राधाकृष्ण यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.