मुंबई, दि. 26 : यवतमाळ जिल्ह्यातील चापडोह प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीसाठी संबंधितांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले.
चापडोह प्रकल्पाकरिता वाढीव भूसंपादन मोबदला मिळण्याबाबतच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.लोणीकर बोलत होते.
श्री.लोणीकर पुढे म्हणाले, चापडोह प्रकल्प पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येत असल्याने या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनीचे संपादन केले आहे, अशा व्यक्तींना त्याचा मोबदला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत देणे आवश्यक आहे. यापूर्वी दिलेला मोबदला व वाढीव मोबदल्यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधी संदर्भात तात्काळ प्रस्ताव तयार करावा व वाढीव मोबदला देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
उपविभागीय अधिकारी श्री.तागडे यांनी या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी यापूर्वी देण्यात आलेला मोबदला व वाढीव मोबदल्याबाबतची सद्य:स्थितीत, लागणारा निधी याबाबतची माहिती दिली.
यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव शामलाल गोयल, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तागडे तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
००००

No comments:
Post a Comment