Wednesday, 13 September 2017

महाराष्ट्र राज्य लॉटरीची गणपती भव्यतम सोडत जाहीर



मुंबई दि. १३ : महाराष्ट्र राज्य लॉटरीची गणपती भव्यतम सोडत दि. ८ सप्टेंबर रोजी राज्य लॉटरी आयुक्त अमित सैनी यांच्या हस्ते नवी मुंबई येथील वाशी कार्यालयात काढण्यात आली.
या सोडतीमध्ये GB-05-08031 या तिकिट क्रमांकास १ कोटी २१ लाख रुपयांचे पहिले बक्षीस जाहीर झाले आहे. या सोडतीत इतर ५९ लाख ६९ हजार ३०० रुपये रकमेची इतर २८ हजार ४२८ बक्षीसे ही जाहीर करण्यात आली आहेत.
००००

No comments:

Post a Comment