Monday, 9 October 2017

जय महाराष्ट्र कार्यक्रमात पर्यटन मंत्री जयकुमार रावल

मुंबई दि.9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या मंगळवार दि. 10 ऑक्टोबर रोजी 'पर्यटन विकासया विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.
 ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:30 ते 8 या वेळेत प्रसारीत होईल. ही मुलाखत रूपलक्ष्मी शिंदे चौगुले यांनी  घेतली आहे. आपल्या राज्याला मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचा वारसा लाभलेला आहे. या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर पर्यटनासाठी करण्यासाठी शासन पुढाकार घेत असून पर्यटकाना पुरेशा सोई सुविधा देण्यासाठी शासन विविध योजना राबवत असते याविषयी सविस्तर माहिती श्री. रावल  यांनी 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment