Monday, 9 October 2017

राज्यातील सायबर सुरक्षेमधील कार्य देशाला मार्गदर्शक - डॉ. गुलशन राय

            मुंबईदि. 9 : राज्यातील सायबर सुरक्षा क्षेत्रातील कार्य देशाला मार्गदर्शक असे आहे. कमी मनुष्यबळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सायबर क्षेत्रात राज्यात उल्लेखनीय कार्य करीत आहेअसे उद्‌गार राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक डॉ. गुलशन राय यांनी काढले.
            डॉ. राय यांनी महाराष्ट्र सायबर सुरक्षा कार्यालयास आज सदिच्छा भेट दिली. डॉ. राय हे विदेशाचे पहिले सायबर सुरक्षा समन्वयक असून यापूर्वी सर्ट (CERT) चे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.
            यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक (सायबर) ब्रिजेश सिंह यांनी महाराष्ट्रातील सायबर सुरक्षेच्या कामाची माहिती दिली.
            डॉ. रॉय पुढे म्हणालेमुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. व्यापार जगतातील देशाचे प्रमुख केंद्र म्हणून मुंबई ओळखली जाते. रिझर्व बँक, शेअर बाजार आणि पोर्ट ट्रस्ट यासारख्या महत्वाच्या आर्थिक घडामोडींचे केंद्र मुंबई आहे. राज्यातील आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने सायबर सेल उभारून सुरक्षा प्रदान करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.
रोखरहित व्यवहार करण्यासाठी जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशात दोन बिलीयन रुपयांची बँकामार्फत उलाढाल होत असते. त्यापैकी मुंबईत मोठ्या प्रमाणात तर महाराष्ट्रात सुमारे 60 टक्के बँकांचे व्यवहार होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सायबर सेलवर सुरक्षेची खूप मोठी जबाबदारी आहे.
००००

No comments:

Post a Comment