Wednesday, 6 December 2017

‘टाटा ओपन महाराष्ट्र टेनीस टुर्नामेंट’ क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरेल - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 6 : टेनीस क्रीडाप्रेमींसाठी बालेवाडी स्टेडीयम येथे होणारी टाटा ओपन  महाराष्ट्र टुर्नामेंट पर्वणी ठरेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.
 असोशीएशन ऑफ टेनीस प्रोफेशनल्स (एटीपी) या नामांकीत क्रीडासंस्थेच्या वतीने  बालेवाडी येथे 1 ते 6 जानेवारी दरम्यान होणाऱ्या एटीपी क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे (लोगोचे) अनावरण आज मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृह येथे झाले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात पहिल्यांदा एटीपी या प्रतिष्ठीत टेनीस स्पर्धेचे आयोजन होत आहे.  भविष्यातही अशा क्रीडा स्पर्धेंचे आयोजन करायला आवडेल. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय नामांकित खेळाडुचा सहभाग असेल. नवोदित खेळाडूंसाठी या स्पर्धेतून प्रेरणा मिळेल. राज्याच्या क्रीडा इतिहासात या स्पर्धेच्या आयोजनाने नवा अध्याय लिहीला जाईल.
बालेवाडी येथे असणाऱ्या क्रीडा सुविधांचा उपयोग चांगल्या पध्दतीने करण्यात यावा, असेही त्यांनी सुचविले.
अदार पुनावाला क्लीनसीटी इनिसिएटिव्ह, महाराष्ट्र शासन, ऑल इंडिया टेनीस असोसिएशन व महाराष्ट्र राज्य लॉन टेनीस संघटना यांनी या  स्पर्धेचे प्रायोजकत्व घेतले आहे.
यावेळी या पत्रकार परिषदेला आयोजन समिती प्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन, बनमाली अग्रवाल, आयोजन समितीचे सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण दराडे, संजय खंदारे, टुर्नांमेट डायरेक्टर प्रशांत सुतार उपस्थित होते.

००००

No comments:

Post a Comment