निगडे जिल्हा पुणे येथील पाझरतलाव फूटून शेतीचे झालेल्या नुकसानाबद्दल संबंधित उपअभियंता व शाखा अभियंता यांना निलंबित करण्यात येईल. त्याचबरोबर पाझर तलावाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल, असे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य संग्राम थोपटे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना प्रा. शिंदे म्हणाले की, हा पाझर तलाव फूटल्याने 41 शेतकऱ्यांचे तीन लाख 87 हजार 473 रुपयांचे नुकसान झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. ठेकेदारावर 89 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्य अभियंत्याच्या माध्यमातून ठेकेदाराची चौकशी केली जाईल.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री अजित पवार, राहुल कुल यांनी भाग घेतला.
00

No comments:
Post a Comment