Friday, 22 December 2017

कारागृहातील कैदी मृत्यू प्रकरणी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून चौकशी

नागपूर, दि. 22 :  नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदी क्रमांक  6533 बळीराम इस्तारी दमाहे, वय 74 यांचा मृत्यू दिनांक 6 डिसेंबर 2017 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे झाला. तसेच कैदी क्रमांक 7669 विश्वनाथ हागरु धांडे, यांचा मृत्यू दिनांक 29 नोव्हेंबर 2017 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे झाला.  या मृत्यूबाबतची दंडाधिकारीय चौकशी उपविभागीय दंडाधिकारी, नागपूर (शहर) यांचे मार्फत करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी नागपूर यांनी दिले आहेत.
या कैद्यांच्या मृत्यूबाबत त्या घटनेची कारणे व परिस्थिती तसेच मृत्यूस कारणीभूत असलेली इतर संयुक्तिक कारणे यात शासन यंत्रणेकडून झालेली दिरंगाई, दाखल करण्यात आलेले खोटे अहवाल याबाबत उपविभागीय दंडाधिकारी, नागपूर (शहर) हे या बाबींवर दंडाधिकारीय चौकशी करणार आहेत.
या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिनाऱ्यांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसिल कार्यालय, नागपूर शहर येथील खोली क्रमांक 1 मध्ये दिनांक 16 जानेवारी 2018 रोजी किंवा तत्पूर्वी सादर करावी, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी शिरीष पी. पांडे यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे कारागृहातील न्या.बंदी क्रमांक 340/17 शिवम मनोज वैद्य यांचा मृत्यू दिनांक 14 ऑक्टोंबर 2017 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे झाला.
            या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिनाऱ्यांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसिल कार्यालय, नागपूर (शहर) येथील खोली क्रमांक 1 मध्ये दिनांक 5 जानेवारी 2018 रोजी किंवा तत्पूर्वी सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



*******

No comments:

Post a Comment