नागपूर, दि. 21 : उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे प्रकाशित डॉ.बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र खंड क्रमांक 22 (सुधारित) चे प्रकाशन राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. राजभवनामध्ये आयोजित या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव सिताराम कुंटे, सहसचिव सिद्धार्थ खरात, सदस्य सचिव अविनाश डोळस, हरिभाऊ शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित 400 पानांच्या या चित्रमय चरित्र खंडात विविध पत्रे, जुने छायाचित्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदव्या व प्रमाणपत्रांचे फोटो, सिडनहॅम कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज व मिलिंद महाविद्यालय यांच्यासह अनेक दुर्मिळ छायाचित्र या खंडात समाविष्ट आहे.
*******

No comments:
Post a Comment