मुंबई, दि.3 : न्युयॉर्क येथील टेलिकॉम
क्षेत्रातील जीपीएक्स कंपनी मुंबईमध्ये तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
असल्याचे जीपीएक्स कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निकोलस टॉन्झी
यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. श्री.टॉन्झी यांनीआज वर्षा
निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून डेटा सेंटरच्या तंत्रज्ञानाविषयीआणि
इंटरनेट सर्व्हरबाबत माहिती दिली.
जीपीएक्स कंपनीने अंधेरी
येथे अत्याधुनिक डेटा सेंटर उभारले आहे. तेथे त्यांनी 140 कोटी रूपयांचीगुंतवणूक
केली आहे. त्या ठिकाणी गुगल, ॲमेझॉन, फेसबूक, नेटफ्लिक्स, फेडेक्स, व्हेरिझॉन आदी
आंतरराष्ट्रीय टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांनी आपले सव्हर्स स्थापित केले आहेत.
ही कंपनीमुंबईमध्येमाहिती
तंत्रज्ञान क्षेत्रात नव्याने तीनशे कोटी रुपयांचीगुंतवणूक करणार असून महिनाभरात
त्याचा शुभारंभ होणार आहे.
यामुळे इंटरनेट सेवा
घेणारे समाज माध्यमे, विविध कंपन्यांचे डाटा सेंटर यांना जलद गतीने आणिस्वस्त दरात
सेवा उपलब्ध होणार आहे.मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नव्याने उभारण्यात येणाऱ्या
डाटा सेंटरच्या निर्मितीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी जीपीएक्स कंपनीचे
व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोज पॉल उपस्थित होते.
००००


No comments:
Post a Comment