Friday, 2 February 2018

भिवापूर येथे खडीगंमत महोत्सवाला आजपासून सुरवात


नागपूर, दि. 2 :  सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भिवापूर येथील बॉईज हायस्कूल परिसरात उद्या दिनांक 3 फेब्रुवारी पासून खडीगंमत महोत्सवाला सुरवात होत असून हा महोत्सव 9 फेब्रुवारी2018 पर्यंत चालणार आहे खडीगंमत या विदर्भातील अतिशय पुरातन लोकनाट्याचे सादरीकरण  दररोज सायंकाळी 6.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
खडीगंमत महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, विधानसभेचे सदस्य सुधीर पारवे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती योगिता चिमूरकर, पंचायत समिती भिवापूरचे सभापती केशव ब्रम्हे, नगराध्यक्ष लव जनबंधू तसेच खडीगंमतचे अभ्यासक हरिश्चंद्र बोरकर प्रामुख्याने उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
***** 

No comments:

Post a Comment